मोठ्या नेत्याचा गौप्य्स्फोट ; लवकरच भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेला नेता असेल
A big leader's secret explosion; Soon the BJP president will also be a leader from the Congress

राज्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा झटका बसला असून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
चव्हाण आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलीय आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे काही आमदार देखील भाजपच्या गळाला लागल्याची माहिती मिळत आहे.
या राजकीय घडामोडीदरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. लवकरच भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेला नेता असेल असे ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आता मी बघतोय, निवडणूक आयोग म्हणून जो लबाड बसला आहे त्याने शिवसेना, राष्ट्रवादी चोरांच्या हातात दिली, आता काँग्रेससुद्धा अशोकरावांच्या हातात देतात का ते बघूयात कारण हे काहीही करू शकतात.
अबकी बार एवढे पार, तेवढे पार… एवढे असतील तर फोडाफोडी का करत आहात? तुम्ही चारशे नाही तर चाळीस देखील पार होणार नाहीत. म्हणूनच तुम्ही नितीश कुमार,
अशोक चव्हाण, अजितदादा, एकनाथ शिंदे यांना घेत आहात. भाजपणे प्रामाणीकपणे काम केलं असतं तर ही वेळ आली नसती.
भाडोत्री लोकं घेत आहेत आणि भाजपच्या निष्ठावंत लोकांच्या डोक्यावर बसवत आहेत. काही दिवसांपूर्वी यांचा नारा काँग्रेसमुक्त भारत असा होता.
आता त्यांची परिस्थिती काँग्रेस व्याप्त भाजप होईल. आणखी काही वर्षांनंतर भाजपचा अध्यक्ष देखील काँग्रेसमधून आलेला असेल असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
अशोकरावांच मला आश्चर्य वाटतंय… काल परवापर्यंत ते जागावाटपामध्ये हिरीरीने भाग घेत होते. आज अचानक असं काय घडलं… मला वाटतं की त्यांना आता राज्यसभेची जागा देत आहेत.
प्रत्येकजण आपापलं बघतोय. पण शेतकऱ्यांच्या घराकडे कोण बघतोय? मला आता राज्यसभा मिळाली मी पुढची सहा वर्ष आरामात राहीन पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे, त्याच्या घरामध्ये रोज तुला शिव्या दिल्या जात आहेत असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपवण्यासाठी गेले असे म्हणत आहेत, तर असू शकतं. कारण अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर १० दिवसांच्या आत अजित पवार तिकडे गेले.
म्हणजे शेतकऱ्यांना कोणतीही गॅरंटी नाही. रोजीरोटीची गॅरंटी नाही, पण भ्रष्टाचाऱ्यांनो भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या आम्ही तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री-मुख्यमंत्री करू ही मोदी गॅरंटी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.