जाणकरांकडून उमेदवारी अर्ज भारण्यापूर्वीच “विकासाच्या गुदगुल्या !”

Tickles of development even before filling the candidature

 

 

परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर यांचा परभणी जिल्ह्याच्या विकासाचा प्लॅन पाहून परभणीकर घायाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत.

 

 

 

परभणीचा विकास बारामती, रायबरेली, गांधीनगर, वाराणसी सारखा करू असे सांगून जानकरांनी परभणीकरांना विकासाच्या गुदगुल्या केल्या आहेत.

 

 

 

 

कारण एवढा विकास परभणीकर कधी स्वप्नातही पाहू शकत नाही आणि चक्क ते करण्याचे आश्वासन उमेदवारी अर्ज भारण्यापूर्वीच देऊन मतदारांची चेष्टा तर केली नाही ना? आ प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडल्याशिवाय राहणार नाही.

 

 

 

पक्ष एक निशाणी दुसरीच आणि निवडणुकीत उभा करणारा पक्ष तिसराच अशी विचित्र अवस्था सध्या महादेव जाणकारांची झालेली आहे.

 

 

होय ! खरेच आहे,त्यांचा पक्ष रासपा त्या पक्षाची निशाणी कपबशी,आता जानकर परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत घड्याळ या चिन्हावर ,विशेष म्हणजे घड्याळ हे चिन्ह जानकरांना मिळाले भाजपमुळे

 

 

 

असा हा सगळा गुंतागुंतीचा राजकीय प्रवास करत महादेव जानकर परभणी लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज महायुतीतून राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार म्हणून भरणार आहेत .

 

 

 

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या कोट्यातील परभणी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली असून

 

 

 

या संधीचे सोने करून कित्येक वर्षापासून अतिमागास राहिलेल्या परभणी जिल्ह्याचा विकास करणार असल्याची माहिती महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर आज रविवारी (दि.३१) परभणीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 

जानकर हे सोमवारी (दि.१) मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जानकर परभणीच्या विकासासाठी खूपच आतुर असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून जाणवले

 

 

 

.
जानकर यांनी आपली भूमिका मांडताना आपल्या सामाजिक,राजकीय कामाची यादीच यावेळी मंडळी. सांगितले की, मी महाराष्ट्राचा रहिवासी असून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षापासून काम करीत आहे या काळात कधीही स्वतःच्या घरी गेलो नाही.

 

 

 

जनतेची सेवा करत आहे. परभणीचा किती विकास केला हा संशोधनाचा विषय आहे. आणि आता जानकर जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान देतील ?

 

 

 

जानकर म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसने मला दत्तक घेतले आहे, आता हळू हळू जानकरांना प्रचारादरम्यान कोण कोणाला दत्तक घेतले कळून चुकेल

 

जाणकार यांच्या उमेदवारीमुळे त्यांना बाहेरचा उमेदवार म्हणून विरोध होऊ शकतो त्यामुळे जाणकारांनी स्वतःच सांगून टाकले कि माझ्याकडे उपरा म्हणून कुणी बहकवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याकडे लक्ष देवू नये.

 

 

 

असे सांगत जानकरांनी उमेदवारी भरण्याच्या पूर्वीच जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मांडला त्यात परभणीत एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नाही,

 

 

 

समृध्दी महामार्ग परभणी जिल्हयातून का जात नाही, जिल्हयाचा मूलभूत विकास का झाला नाही? असे अनेक प्रश्न असून ते सोडविण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच आपण ही निवडणूक लढवत आहोत,

 

 

 

 

असे सांगत चक्क बारामती, रायबरेली, गांधीनगर, वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत शरद पवार, सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासाच्या धर्तीवर परभणीचा कायापालट करू असे सांगून टाकले

 

 

 

पण हे जरा अति झाले कारण एवढा मोठा विकास हे परभणीकरांच्या पचनी पडनार नाही,त्यामुळे जाणकारांनी यापुढे एवढ्या मोठ्या विकासाची आश्वासने नाही दिले तरी चालते अशीच अशा परभणी जिल्हावासी त्यांच्याकडून व्यक्त करीत आहेत .

 

 

 

परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून जानकर यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केलेली असून

 

 

 

 

जानकर यांना निवडून आणण्यासाठी महायुतीच्या वतीने सर्व घटक पक्ष १०० टक्के काम करणार आहेत.असे आश्वासन यावेळी स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले मात्र आता पुढे काय काय होते त्याची खात्री जानकरांना निश्चितच होईल असे म्हणायला हरकत नाही

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *