सावधान;चक्क ATM मशीनमध्ये छेडछाड करून होतेय लुट, ६ जणांना अटक

Beware; Looting is taking place by tampering with Chak ATM machine, 6 persons arrested ​

 

 

 

 

बँकांच्या एटीएम सेंटरमधील एटीएम मशीनमध्ये छेडछाड करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात कुरार पोलिसांना यश मिळाले आहे.

 

 

या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींविरोधात उत्तरप्रदेशमध्येही अशाच प्रकारचे तब्बल ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हा कुरार पोलीस ठाण्याशेजारील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता.

 

 

यावेळी पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही पैसे बाहेर आले नाहीत. मात्र पैसे खात्यातून काढल्या गेल्याचा मेसेज मोबाईल वरती आला होता.

 

 

 

या प्रकारामुळे काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने त्याने या प्रकरणाची कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

 

 

या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला असता एटीएम सेंटरमध्ये काही तरुण मशीनसोबत छेडछाड करत असल्याचे आढळून आले.

 

 

याच माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून आप्पा पाडा परिसरातून ताब्यात घेतले.

 

 

रामू राम उर्फ आदित्य दयाराम भारतीय (२९ वर्षे) सुरज राजेश तिवारी (२२, वर्षे) संदीप कुमार रामबहादुर यादव (२४, वर्ष) अशोक हरिहरनाथ यादव (३६, वर्ष) राकेश कुमार रामबाबू यादव (४०, वर्ष) आणि रवी कुमार महेंद्र कुमार यादव (३१, वर्ष)

 

 

अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत . पोलिसांनी या संदर्भात अधिक तपास केला असता अशाच प्रकारचे आरोपींविरोधात उत्तर प्रदेशमध्येही ११ गुन्हे असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *