ठाकरे गटाला मोठा धक्का;मराठवाड्यातील माजी मंत्र्यांचा शिंदे गटात प्रवेश

A big blow to the Thackeray group; former minister of Marathwada joins the Shinde group

 

 

 

 

 

 

 

 

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे मराठवाड्यातील माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला . मुंदडा शिवसेना सोडणार असल्याचे वृत्त दैनिक खरा दर्पण ने यापूर्वीच प्रसिद्ध की होते.

 

 

 

काल शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला . यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी

 

 

 

मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी मुंदडा यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे वसमत विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार राहिले आहेत. तर पाच वर्षे कॅबिनेट मंत्री (सहकार मंत्री) म्हणून त्यांची यशश्वी कारकीर्द आहे.

 

 

 

 

शिवसेना उद्धव ठाकरे गटात गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर सतत अन्याय होत असल्यामुळे त्यांनी शेवटी कंटाळून शिंदे गटात प्रवेश केला आहे असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

 

 

 

२०१९ मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीच्या त्यांना तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते परंतु ऐनवेळी हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली,

 

 

 

 

त्यानंतर पुन्हा या 2023 च्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु ऐनवेळी आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली.

 

 

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला विश्वासात न घेता परस्पर उमेदवार दिल्यामुळे मुंदडा नाराज होते, पक्षात कोणीही आपले ऐकून घेत नसल्याने,

 

 

 

पक्षांतर्गत अन्यायायाला कंटाळून शेवटी मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असे मुंदडा यांनी यावेळी सांगितले.

 

 

जयप्रकाश मुंदडा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये शिंदे गटाची राजकीय ताकद वाढणार आहे . येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंदडा यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

 

 

मुंदडा यांच्या प्रवेशाच्या वेळी खासदार नरेश मस्के, हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव उपजिल्हाप्रमुख राजू चापके यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *