मुख्यमंत्र्यांना जाहीर शिवीगाळ; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला अटक
Public abuse of Chief Minister; Big leader of Thackeray group arrested

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते
आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे.
शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदेगटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
त्यानुसार भांडुप पोलिसांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्या विरोधात भादवी कलम १५३(अ),१५३ (ब),१५३(अ)(१)सी, २९४, ५०४,५०५(१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी (२७ नोव्हेंबर) भांडुपमधील ईशान्य मुंबईत मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या
‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी जोरदार टीका केली होती. यावेळी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने हा गुन्हा दाखल करम्यात आला होता .
जाहीर सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्या वापरल्याने शिंदे गटातील नेते व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं, असा आरोप करत शिंदे गटाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती .