अशोक चव्हाणांनी अमित शाहांच्या समोर केला संकल्प
Ashok Chavan resolved in front of Amit Shah
गृहमंत्री अमित शहा यांचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची पहिली सभा आज (दि.5) जळगाव जिल्ह्यात पार पडली आहे.
त्यानंतर दुसरी सभा संभाजीनगर येथे पार पडली. संभाजीनगर येथील सभा विशेष ठरली आहे. कारण मोठ्या कालावधीनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासमोर भाषण करताना दिसल्या आहेत.
तर दुसरीकडे अशोक चव्हाणही भाजपवासी झाल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय नेतृत्वासमोर भाषण करताना दिसले आहेत. दोघेही संभाजीनगरच्या सभेमुळे चर्चेचा विषय ठरले आहेत.
400 पेक्षा जो नारा लावला आहे त्यात, सर्वाधिक जागा मराठवाड्यातील असतील.असे अशोक चव्हाण म्हणाले , यापूर्वी मराठवाड्यात आम्ही आमने-सामने होतो, आता सोबत काम करणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा नारा लावला आहे. त्याप्रमाणे आम्ही देखील मराठवाड्याला विकसित करण्यासाठी प्रयत्न करु.
रस्त्यांचे काम झाले, शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आले, फक्त आश्वासनच नाही तर काम झाली आहे. मागील दहा वर्षात जोरदार विकासाचे काम झाले आहे.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, मी दुसऱ्या पक्षात असताना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केली नाही. कारण त्यांनी विकासाचं काम केलं आहे.
रावसाहेब दानवे यांनी मराठवाड्यात रेल्वे वाढवण्याचे काम केलं आहे. मराठवाड्याच्या विकासाच्या अनेक निर्णय घेण्यात आले.
मराठवाड्यातील आणखी काही प्रश्न मार्गी लावायचे आहे. मराठा समाजाला या सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. सगेसोयरेचा विषय देखील कायदेशीररित्या मार्गी लागणार आहे यात मला शंका नाही.
त्यामुळे मिळून काम करुयात असे अशोक चव्हाण म्हणाले.विशेष म्हणजे व्यासपीठावर अशोक चव्हाण यांची जागा त्यांचे जिल्ह्यातील पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या अगदी जवळ होती.
आजवर भाजपच्या अनेक महत्वाच्या इव्हेंटमध्ये पंकजा मुंडे यांना संधी दिली जात नाही, अशी तक्रार त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात होती.
आता मात्र, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. पंकजा मुंडे यांनी भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे.