शरद पवार लागले निवडणुकीच्या कामाला ;राष्ट्रवादीच्या विभागीय प्रभारींच्या नियुक्त्या केल्या जाहीर

Sharad Pawar starts election work; Appointments of NCP's divisional in-charges announced

 

 

 

सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली आहे. पक्षवाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

राजेश टोपे, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. नव्या उमेदीनं कामाला लागा, अशा सूचना देखील शरद पवारांच्या बैठकीत देण्यात आल्या आहे. तसेच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्ष पुन्हा नव्या जोमाने निवडणुकीला सामोरा गेला पाहिजे यासाठी पवारांच्या पक्षाकडून महाराष्ट्रभर विभागीय प्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे.

 

विभागवार महाराष्ट्र पिंजून काढा आणि 3 महिन्यांत अहवाल द्या, असे आदेश देण्यात आले आहे. पक्ष संघटनवाढीसाठी शरद पवारांच्या पक्षाचा नवा अजेंडा राबवण्यात येत आहे.

 

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हंड्रेड डेज ट्रॅकींग टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

जिथे रिक्त पद असतील तिथे पद भरली जाणार आहेत. पदाधिकारी बदलायची जर गरज वाटत असेल तर पदाधिकारी देखील बदलले जातील.

 

सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमावर शरद पवारांची शॅडो कॅबिनेट लक्ष ठेवणार आहे. नव्या उमेदीनं कामाला लागा, शरद पवारांच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहे.

 

शरद पवार गटाकडून महाराष्ट्रभर विभागीय प्रभारींची नेमणूक करण्यात आली आे. विभागवार महाराष्ट्र पिंजून काढा आणि तीन महिन्यांत अहवाल द्या, असे आदेश शरद पवारांनी विभागीय प्रभारींना देण्यात आल्या आहे.

 

या बैठकीबाबत पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाले. त्यामध्ये सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणारी टास्क टीम तयार करण्यात आली.

 

तसंच विभागनिहाय जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं असून 7-8 मार्चपासून या नेत्यांना विभागनिहाय दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय हा महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होईल. या अधिवेशनात विरोधी पक्ष नेतेपदाबाबत जो प्रस्ताव दिला जाईल त्यावर सरकारनंही विचार करावा असा ठराव या बैठकीत मांडण्यात आला आहे.”

 

या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती अखण्यात आली आहे.

 

जिथे रिक्त पद असतील तिथे पद भरली जाणार आहेत. पदाधिकारी बदलायची जर गरज वाटत असेल तर पदाधिकारी देखील बदलले जातील.

 

पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नव्या उमेदीने कामाला लागण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत. पुढच्या तीन महिन्यात महाराष्ट्र पिंजून काढा आणि त्याचा अहवाल द्या असे आदेश पवारांनी नेत्यांना दिले आहेत.

 

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विभागीय प्रभारी?

मराठवाडा- राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगांवकर

विदर्भ- राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख

 

 

कोकण- जितेंद्र आव्हाड आणि सुनिल भुसारा

प. महाराष्ट्र- हर्षवर्धन पाटील

उत्तर महाराष्ट्र- हर्षवर्धन पाटील

 

सिनेअभिनेत्री स्वरा भास्करचे पती फाहाद एहमद हे विधानसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षातtन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाले . फहाद एहमद यांची राष्ट्रीय युवा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

अणुशक्ती नगर मधुन त्यांनी नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक विरोधात निवडणूीत पराभुत झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी फहाद अहमद यांची निवड करण्यात आली आहे.

 

फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत. त्यांची युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *