भाजपने केली अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडातून काढण्याची मागणी

BJP has demanded the removal of Abdul Sattar from the cabinet

 

 

 

 

महायुतीच्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केले. युतीमध्ये असताना त्यांनी युतीधर्म पाळला नाही.

 

 

 

 

यामुळे अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सिल्लोड भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी केली आहे.

 

 

 

 

यासाठी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा तोंडावर असताना महायुतीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे.

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच वेळा खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. रावसाहेब दानवे यांच्या पराभवामध्ये

 

 

 

 

अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड तालुक्यांमध्ये देखील रावसाहेब दानवेंना कमी मतं मिळाली. यामुळे सत्तार विरुद्ध भारतीय जनता पार्टी असा संघर्ष सुरू झाला आहे.

 

 

 

 

 

जालना लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या डॉ. कल्याण काळे यांची अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमात भेट घेतली. यावेळी हे माझे जवळचे मित्र असल्याचे वक्तव्य केलं.

 

 

 

 

तेव्हापासून वादाची ठिणगी पडली. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी सत्तारांवर तोफ डागत सिल्लोड आता छोटा पाकिस्तान होईल असे वक्तव्य केले.

 

 

 

यावर आता सिल्लोड येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

 

 

 

 

पत्रात म्हटले आहे की नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले. त्यांच्या विजयात आम्हाला अपेक्षित वाटा उचलता आलेला नाही, याची सल मनात आहे.

 

 

 

 

सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अजून एक कारण म्हणजे मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधात काम केले. सिल्लोड तालुक्यात भाजपला मानणारा मोठा मतदार आहे, हा मतदार संपवण्यासाठी अब्दुल सत्तार प्रयत्न करत आहेत.

 

 

 

 

आतापर्यंत आम्ही सगळे सहन केलं मात्र देशाच्या सर्वात महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांनी गद्दारी केली. लोकनेते रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्याचे पाप त्यांनी केले.

 

 

 

यामुळे भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया यांनी पत्रातून केली आहे

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *