लग्नातील जेवणातून १०० वऱ्हाडींना विषबाधा

100 grooms poisoned from wedding food

 

 

 

 

चाळीसगाव येथील हिरापूर रोडवरील एका लॉन्समध्ये लग्नातील वऱ्हाडींना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

वर आणि वधूकडील तब्बल १०० पेक्षा अधिक वऱ्हाडींना सौम्य प्रकारची विषबाधा झाली असून त्यातील अनेक वऱ्हाडींवर चाळीसगाव येथे वेगवेगळ्या खाजगी रूग्णालयांमध्ये तर वधूकडील वऱ्हाडींवर जळगाव तालुक्यातील दापोरे येथे आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत.

 

दापोऱ्यात सकाळपासून आरेाग्य विभागाचे पथक तळ ठोकून आहे.या घटनेच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव शहर पोलीसांनी रूग्णालयांमध्ये जावून विषबाधा झालेल्या वऱ्हाडींचे जाब जबाब घेऊन विषबाधेचे कारण जाणून घेतले.

 

 

तर अन्न आणि अन्न निरीक्षकांनी लग्नातील जेवणाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी नाशिक येथे पाठवले आहेत.
घटनेची माहिती अशी की,

 

 

हिरापूर येथील मुलाचा विवाह गुरूवारी जळगाव तालुक्यातील दापोरे येथील मुलीशी चाळीसगाव येथील हिरापूर रेाडवरील सुयश लॉन्समध्ये पार पडला.या विवाहाला वधू व वर अशा दोघांकडील वऱ्हाडी मोठ्या संख्येने आली होती.

 

लग्नानंतर दुपारी वऱ्हाडींनी डाळभात, शेवपुरी, गुलाबजाम, छोले वांगे जिलबी असा जेवणाचा आस्वाद घेतला. लग्नानंतर वधू व वरांकडील वऱ्हाडी आपापल्या घरी गेले.

 

 

मात्र सायंकाळी या वऱ्हाडींना अचानक जुलाब, उलट्या होवू लागल्या.वऱ्हाडींना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार लक्षात येताच या विषबाधीत झालेल्यांना तात्काळ चाळीसगाव शहरातील विविध पाच ते सहा रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

 

चाळीसगाव शहरातील रूग्णालयांमध्ये वऱ्हाडींवर सध्या उपचार सुरू असून त्यांनी प्रकृती स्थिर असल्याचे तालुका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

 

 

आरोग्य विभाग या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. लग्नातील वऱ्हाडींना विषबाधा झाल्याचा प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक विशाल टकले,

 

 

पोलीस नाईक राकेश पाटील व सहकाऱ्यंानी खाजगी रूग्णालयांमध्ये धाव घेऊन विषबाधीत रूग्णांचे जाबजबाब घेतले.
दरम्यान लग्नात जेवणानंतर सुमारे २०० हून अधिक वऱ्हाडींना

 

 

विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाने मंगल कार्यालयातील डाळभात, शेवपुरी, गुलाबजाम, जिलेबी, छोले वांगे

 

 

आदी अन्न पदार्थ व पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी नाशिक येथे प्रयोगशाळेत पाठवले.हा अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे खरे कारण समजून येणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *