हेट क्राइम च्या माध्यमातून महिलांना त्रास देणाऱ्याविरोधात गुन्हे दाखल
Cases filed against those who harass women through hate crime

पुणे/ संपूर्ण देशभर जातीय- धार्मिक थोडक्यात सामाजिक भेदभाव आणि सार्वजनिक द्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे, पुण्यासारख्या शहरातील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्यामध्येही हे लोन पसरले असल्याचे दिसून येत आहे,
मात्र असा द्वेष करणारा आणि या सामाजिक स्थितीचा गैरफायदा घेऊन पीडित कुटुंबातील महिलेवर पाळत ठेवून मानसिक छळ करणाऱ्या समाजकंटकविरोधात कोंडवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मात्र या कारवाईसाठी पीडित कुटुंबाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला, आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.
आता पीडित कुटुंब पोलिसांकडून होणाऱ्या पुढील कारवाईची वाट पाहत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कोंडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एक मुस्लिम कुटुंब राहते,
एकमेव मुस्लिम कुटुंब या सोसायटीत कशाला आहे याचा राग धरून सोसायटीमधील प्रल्हाद विठोबा सपकाळ आणि संतोष मॅथ्यू यांच्याकडून पीडित कुटुंबातील महिलेला त्रास देणे,
पाळत ठेवणे, पिच्छा करणे असे प्रकार त्याने सुरु केले, पिडित महिला आहे त्यात वाद नको म्हणून दीर्घकाळ असे प्रकार सहन करत राहीली, मात्र या समाजकंटक समूहाची मजल इथपर्यंत गेली की,
या कुटुंबाला मिळालेल्या पार्किंगमध्ये सिसीटीव्ही लावून स्वतःच्या मोबाइलवर एक्सिस घेऊन हे पाळत ठेवू लागले, हा त्रास वाढल्यानंतर घरातल्या पुरुषांना याबाबत सांगितल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली गेली
मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही, या द्वेषाचा त्रास अनावर झाल्यानंतर पीडित कुटुंबाने विचारणा केल्यावर झालेल्या भांडणात कुटुंबाला सोसायटी सोडून पाकिस्तानात निघून जा असा सार्वजनिक दम दिला
आणि अर्वाच्च भाषेत जातीवाचक शिवीगाळ केली, खोटा बनाव करुन विषय सामाजिक मुद्द्यांकडे नेण्याचा प्रयत्न केला, कोंडवा पोलिसांनी आलेल्या तक्रारीवर गुन्हा दाखल न करता,
निवडणुकीच्या काळात तणाव नको अशी भूमिका घेऊन सामंजस्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले मात्र याचा उलटा परिणाम झाला, आरोपीची हिंमत वाढत गेली,
पीडित कुटुंबाला त्रास देण्याची एकही संधी हे समाजकंटक सोडत नव्हते, त्रास वाढल्यावरही पोलीस कारवाई होत नाही असे ठामपणे वाटल्यावर पीडित कुटुंबाने न्यायालयात अर्ज केला
आणि न्यायालयाने एकूण स्थिती जाणून घेऊन पोलिसांना कडक कारवाईचे आदेश देऊन केलेल्या कारवाईबाबत न्यायालयास अवगत करण्याच्या सूचना केल्या,
त्यानंतर पोलिसांनी महिला विरोधी अत्याचार तसेच जातीय धार्मिक तणाव वाढवून केलेल्या छळाबद्दल भारतीय न्याय संहितेमधील विविध कलमांतर्गत या दोन गुंड प्रवृत्तीच्या इसमाविरोधात गुन्हे दाखल केले आहेत,
पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत, अशा प्रकरणात पीडित कोणत्या जाती धर्माची आहे याबाबत बाऊ करून सामाजिक वातावरण बिघडू नये असा सल्ला देत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्याचे प्रकार राज्यात ठिकठिकाणी घडत आहेत,
न्यायालयाच्या माध्यमातून पोलिसांच्या अशा पायंड्याला चपराक मिळाली आहे, अशा वातावरण खराब करणाऱ्या प्रवृत्ती कायद्याने वेळीच कारवाई करुन ठेचल्यास वातावरण बिघडणार नाही,
खरे तर हे लक्षात घेण्याची अधिक गरज आहे, अशी प्रतिक्रिया विविध स्तरातून उमटल्या आहेत, तसेच पोलिसांनी आता कडक कारवाई करून या दोन व्यक्ती आणि समुहास शिक्षा मिळेपर्यंत निरपेक्ष काम करावे, अशी अपेक्षा पीडित कुटुंबाने व्यक्त केली आहे.