जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिला सरपंचाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Female sarpanch attempted self-immolation in front of the collector's office

 

 

 

 

ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एका महिला सरपंचासह तीन जणांनी अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र, पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन महिलांच्या हातातील पेट्रोलची बाटली काढून घेतली. त्यामुळे, मोठा अनर्थ टळला. गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी ग्रामपंचायतीच्या सरपंच असलेल्या

 

मस्के कुटुंबाकडून हा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला होता. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक देयकाची रक्कम अडवून घेतली जात असल्याने संताप व्यक्त करत मस्के कुटुंबीयांनी हा राग व्यक्त केला.

 

मात्र, वेळीच पोलीस प्रशासन दाखल झाल्यानं पुढील अनर्थ टळला आहे. अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वतःला पेटविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

 

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रेवकी देवकी ग्रामपंचायत अंतर्गत 11 कामे करण्यात आली आहेत. मात्र, त्याची 96 लाख रुपयांची देयक प्रशासनाकडून रोखण्यात आली.

 

त्यामुळे सरपंच शशिकला भगवान मस्के, मयुरी मस्के आणि बाळासाहेब मस्के या तिघांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगावर डिझेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

 

परंतु, याच दरम्यान पोलीस  प्रशासन दाखल झाल्यानं पुढील अनर्थ टळला आहे. मस्के कुटुंबाला शिवाजीनगर पोलीसांनी पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतलं आहे.

 

जवळपास तासभर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा गोंधळ सुरू झाल्याने पोलीस प्रशासनाची देखील धांदल उडाली होती. मात्र, प्रशासनाकडून देयकाची रक्कम नेमकी कशामुळे अडवण्यात आली आहे,

 

याबाबत स्पष्ट सांगण्यात आले नाही. दरम्यान, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक देयकाची रक्कम अडवली असल्याचा आरोप मस्के

 

कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. तसेच, जिल्हा परिषद मुख्याधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांवरही त्यांनी आरोप केले आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *