उमेदवार ठरविण्यासाठी आयोजित मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी

Heavy clashes in Maratha community meeting organized to decide candidates

 

 

 

 

 

मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार हाणामारी झाली आहे. मराठा समाजाचा उमेदवार ठरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

 

 

 

यावेळी कार्यकर्ते आपापसात भिडले. या बैठकीत कोणीही उमेदवारीसाठी आपल्याकडून नावं सुचवू नयेत असा प्रोटोकॉल ठेवण्यात आला होता.

 

 

 

 

पण यावेळी अनेकजण नावांचे प्रस्ताव मांडू लागल्यानंतर हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समजाला गावागावात बैठका घेऊन,

 

 

 

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरवण्याचं आवाहन केलं होतं. याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

 

 

 

संभाजीगरमध्ये सकल मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण ही बैठक आयोजित करण्यावरुनच वाद झाला.

 

 

 

 

बैठक कोणी आयोजित केली यावरुन उपस्थिांमध्ये वाद झाला. दरम्यान यावेळी काहींनी उमेदवारीसाठी नावं घेण्यास सुरुवात केल्यानंतर हा वाद आणखी वाढला.

 

 

 

 

कोणीही उमेदवारीसाठी नावं सुचवायची नाहीत असं ठरल्यानंतरही नावं घेतल्यानं शाब्दिक वाद झाला आणि याचं रुपांतर हाणामारीत झालं.

 

 

 

बैठकीत उपस्थित एका कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, येथे सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांची सकल मराठा समाजातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

 

 

 

यावेळी कोणीतरी आपल्या व्यक्तीचं नाव सुचवत होतं. सर्वसमावेश उमेदवार द्यायचा असं आमचं ठरलं होतं. जास्त नावं झाली तर

 

 

 

मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जायचं आणि ते अंतिम निर्णय घेतील असं ठरलं होतं. पण येथे काही नावं घेत बंधनं घालण्याचा प्रयत्न झाला आणि वाद झाला.

 

 

 

दुसऱ्या एका कार्यकर्त्याने हा वाद फार दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त केली आहे. “फोनवरुन अचानकपणे या बैठकीचं आयोजन कऱण्यात आलं होतं.

 

 

 

 

पण हेतूपरस्पर नावं घेतल्याने हा वाद झाला. पण वैचारिक लढण्याऐवजी अशाप्रकारे हाणामारी होणं दुर्देवी आहे”. बैठक दोन ते तीन दिवस आधी

 

 

 

बैठक आयोजित करायला हवी होती. तालुक्यातील सर्व लोकांना बोलावलं पाहिजे असं एकमत होतं आणि यावरुन वाद झाला असंही त्यांनी सांगितलं.

 

 

 

 

मनोज जरांगे यांनी लोकसभा निवडणुकीत समाजाचे उमेदवार उभे करायचे असतील तर प्रत्येत जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार उभा करण्याचा पर्याय दिला आहे.

 

 

 

गावोगावी सगळ्यांनी मराठा बांधवांशी बोलून मतं जाणून घ्यावी आणि अंतिम निर्णय घ्यावा असंही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.

 

 

 

गावातील लोकांच्या निर्णयाबाबत माहिती मिळाल्यानंतर अखेरचा निर्णय जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

 

 

 

दरम्यान गेल्या वर्षीच्या मध्यंतरानंतर मराठा आंदोलनाने देशाचेच नाही तर जगाचे लक्ष वेधले. लाखोंचे मोर्चे आणि तितक्याच ताकदीच्या सभांनी महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठी घुसळण झाली.

 

 

 

 

ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटविण्याचा प्रयत्न झाला. मराठा आंदोलकांना या आंदोलनातून अनेक धडे गिरवता आले.

 

 

 

 

आता लोकसभा निवडणुकीत राजकीय धडा गिरविण्याची संधी या आंदोलकांना आली आहे. समाजाने प्रत्येक लोकसभा मतदार संघात जास्तीत जास्त उमेदवार देण्याची मागणी होत आहे.

 

 

उद्या 30 मार्च रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे याविषयीचा निर्णय जाहीर करतील. पण त्यापूर्वी मराठवाड्यातील वकिलांनी त्यांन सबुरीचा सल्ला दिला आहे.

 

 

 

 

 

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील 50 हून अधिक वकिलांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली.

 

 

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी जरागे यांना केले.

 

 

 

कोणत्याही पक्षाशी बांधिलकी न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. कोणत्याही पक्षाशी युती करून निवडणुका लढण्यापासून या वकिलांनी जरांगे यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

 

 

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 मतदारसंघात प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार उभे करायचे की नाही? याबाबत जरांगे हे 30 मार्च रोजी निर्णय घेणार आहेत.

 

 

 

त्यापार्श्वभूमीवर वकिलांनी त्यांची भेट घेतली. लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे केल्यास अथवा युती करुन निवडणुका लढल्यामुळे

 

 

 

मराठा समाजाचे काय संभाव्य नुकसान होऊ शकते, याबाबत जरांगे यांच्याशी या वकिलांनी दीड तासांहून अधिक वेळ चर्चा करून तपशीलवार माहिती दिली.

 

 

 

 

अपक्ष उमेदवार उभे केल्यास, पक्षाशी युती करून निवडणूक लढल्यास आरक्षणाचा मूळ उद्देश बाजूला राहिल. आरक्षण आंदोलनाचे मोठे नुकसान होईल.

 

 

 

 

या निर्णयामुळे समाज बांधवांमध्ये एक प्रकारची संभ्रमाची अवस्था निर्माण होऊन आरक्षण आंदोलनालाच यामुळे खीळ बसण्याची भीती वकिलांनी व्यक्त केली.

 

 

अपक्ष उमेदवार उभे केल्यास मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये अधिक तीव्र ध्रुवीकरण होऊन समाजविघातक शक्ती त्याचा अधिक फायदा उचलतील, याकडेही वकिलांनी लक्ष वेधले.

 

 

 

वकिलांनी जरांगे यांना आरक्षण प्रश्नावर मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या पक्षांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवावा अथवा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे न करता तटस्थतेची भूमिका घेण्याचे आवाहन केले.

 

 

 

 

बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमधील वकिलांचा यामध्ये समावेश होता.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *