परभणीत स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून दहा लाखांचा गंडा

Man duped of Rs 10 lakhs by luring cheap gold in Parbhani

 

 

 

स्वस्तातील सोन्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणुक करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी दहा तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.

 

दैठणा पोलिस ठाणे हद्दीतील काही इसमांनी नांदेड जिल्हयातील लोकांना घराचे बांधकाम करताना सोने सापडले असुन ते आपणास स्वस्तात विकत देउ असे सांगुन

 

१० लाख रूपयांचा गंडा घातला. या टोळीतील चार आरोपींना पकडुन त्यांच्याकडून पाच लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की नांदेड जिल्हयातील लोकांना घराचे बांधकाम करताना सोने सापडले असुन ते आपणास स्वस्तात विकत देउ असे सांगुन आरोपींनी काही जणांना बाभळगाव शिवारात बोलावुन घेतले.

 

त्यांच्याकडील सोन्याचे क्वाईन दाखवुन विश्वास प्राप्त केला व या प्रकरणातील फिर्यादीचे दहा लाख रूपये घेतले. त्यांना पुरून ठेवलेले सोने काढुन आणुन देतो असे सांगुन आरोपींनी पोबारा केला.

 

आरोपी इसम परत न आल्याने तक्रारदार यांना फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीसांना फोनवरून माहीती दिली.

 

पोलीस अधिक्षक श्री. रविंद्रसिंह परदेशी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील हे घटनास्थळी रवाना झाले. आरोपींचा शोध घेतला असता हा गुन्हा उमरी गावातील आरोपीनी केल्याची माहीती मिळाली.

 

त्यावरून सापळा रचुन मोठ्या शिताफिने आरोपी केशव धोंडीराम राठोड ( वय ४७ वर्ष, रा. राम नगर तांडा माजलगाव जि. बीड), उथलराज गर्जेन्द्र भोसले (वय २४ वर्ष, रा. पोहंडुळ ता. सोनपेठ.. जि. परभणी),

 

अशोक दशरथ पवार (वय-५० वर्ष, रा. उमरी ता. जि. परभणी) व इतर एक यांना उमरी गावातुन ताब्यात घेण्यात आल. या सर्वांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

 

त्यांची झडती घेतली असता गुन्हयातील अडीच लाख रूपये त्यांच्याकडे आढळून आले तसेच त्यांनी गुन्हयात वापरलेल्या दुचाकी या वाहनासह आरोपींना दैठणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योती बेळगावे या करीत आहेत. गुन्हयात या आरोपींच्या सोबत शिल्पा अशोक पवार

 

व पुजा उधलराज भोसले व इतर एक असे असल्याची माहीती दिली. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *