मनोज जरांगे या विधानसभेत उमेदवार देणार ;पाहा तुमचा मतदारसंघ त्यात आहे काय ?

Manoj Jarange will give a candidate in this assembly; see if your constituency is in it?

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला जरांगे फॅक्टर महागात पडला. मराठा आरक्षणासाठी ठाम भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फटका सत्ताधाऱ्यांना बसला.

 

 

 

मराठवाड्यातील जवळपास सगळ्याच मतदारसंघांमध्ये मराठा मतदान निर्णायक ठरलं. मराठवाड्यातील आठपैकी सात मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा महायुतीला मिळाली.

 

 

 

 

मराठ्यांना आरक्षण द्या. वाशीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत देण्यात आलेला शब्द पाळा. तिथे उधळण्यात आलेल्या गुलालाचा मान राखा.

 

 

 

अन्यथा गुलाल तुमच्यावर रुसेल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. आम्हाला आचारसंहितेचं कारण सांगू नका.

 

 

 

आमचा प्रश्न सोडवा. अन्यथा आम्हाला राजकारणात उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा सूचक इशारा पाटलांनी दिला आहे.

 

 

मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळी समाजातील सर्वसामान्य उमेदवार देऊन राजकारणात उतरण्याची चाचपणी केली होती.

 

 

 

 

पण त्यावेळी त्यांच्याकडे वेळ कमी होता. आता विधानसभेला तीन ते चार महिन्यांचा अवधी शिल्लक असल्यानं त्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

 

 

राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी १०० मतदारसंघांमध्ये जरांगे पाटील चाचपणी करत आहेत. यातील बहुतांश जागा मराठवाड्यातील आहे.

 

 

 

छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिवमधील विधानसभा मतदारसंघांची चाचपणी करण्यात आलेली आहे. संभाजीनगरातील वैजापूर,

 

 

गंगापूर, कन्नड, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, जालन्यातील बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, बीडमधील बीड, गेवराई, शिरुर, आष्टी, माजलगाव, धाराशिवमधील धाराशिव, भूम, परंड्यात जरांगे समर्थकांकडून चाचपणी करण्यात आली आहे.

 

 

 

मराठा समाजाच्या मतदारांचं प्रमाण अधिक असलेल्या, गेल्या २ टर्मपासून मराठा आमदार निवडून आलेल्या मतदारसंघांची चाचपणी जरांगेंकडून सुरु आहे.

 

 

 

पाटील यांनी उमेदवार दिल्यास महायुतीला लोकसभेप्रमाणेच फटका बसू शकतो. मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फटका भाजपला बसला.

 

 

 

 

मराठवाड्यात त्यांचे चारही उमेदवार पराभूत झाले. जालन्यात गेली ५ टर्म रावसाहेब दानवे निवडून येत होते. त्यांचा पराभव झाला.

 

 

 

बीडमध्ये पंकजा मुंडे निवडणूक हरल्या. विशेष म्हणजे दानवे, मुंडेंना पराभूत करणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयानंतर जरांगेंची भेट घेतली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *