महाराष्ट्राला नवीन 3 वंदे भारत ट्रेन , पहा कोणत्या जिल्ह्यातून धावणार ?

New 3 Vande Bharat train to Maharashtra, see through which district will it run?

 

 

 

वंदे भारत एक्स्प्रेस ही सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रवाशांना दिलासा देणारी ठरली आहे. देशातील विविध जिल्ह्यात वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण होत आहे.

 

महाराष्ट्रालाही आता 11 वंदे भारत मिळाल्या आहेत. पतंप्रधान मोदी यांनी गेल्या काही दिवसांत राज्यातील 3 वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवला आहे.

 

राज्याला पुणे-हुबळी, पुणे-कोल्हापूर आणि नागपूर-सिंकदराबाद या तीन वंदे भारत रेल्वेची भेट मिळाली आहे. यामुळं आता नागरिकांचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

 

नागपूर-सिंकदराबाद-नागपूर वंदे भारत 16 सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. ही गाडी नियमितपणे मंगळवारवगळता आठवड्यातील सहाही दिवस धावणार आहे.

 

ही ट्रेन 575 किमी अंतर केवळ 7 तास आणि 15 मिनिटांत पूर्ण करते. नागपूर-हैदराबाद आणि सिकंदराबाद शहरांना ही ट्रेन जोडते. वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर जंक्शन येथून पहाटे पाच वाजता सुटते.

 

तर, सिकंदराबाद येथे 12.15 वाजता पोहोचते. तर, नागपूर येथे परतताना दुपारी 1 वाजता सिकंदराबाद येथून सुटते आणि नागपूरला 8.20 पर्यंत पोहोचते. सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशा, रामगुंडम, काझीपेठ येथे या रेल्वेगाडीचे थांबे असणार आहेत.

 

19 सप्टेंबर रोजीच कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापूर स्थानकावरून सुटणार आहे.

 

दुपारी दीड वाजता ही गाडी पुणे स्टेशनवर पोहोचणार आहे. तर पुण्यावरून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार दुपारी ही गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटणार आहे

 

ती सायंकाळी 7:40 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानाकावर पोहचणार. कोल्हापूर-पुणे या प्रवासात ट्रेन मिरज,सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर थांबा असेल.

 

पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण पार पडले आहे. 18 सप्टेंबरपासून ही ट्रेन रुळांवर धावण्यास सज्ज झाली आहे. पुणे-हुबळी वंदे भारत गुरुवारी, शनिवारी आणि सोमवारी धावणार आहे.

 

ही ट्रेन पुण्यातून दुपारी 2.15 वाजता सुटेल, सांगलीत 6.10 ला, बेळगावला 8.34, धारवडला 10.30 पर्यंत पोहोचेल. हुबळीत रात्री 10.45 ला पोहोचेल.

 

तर, परतीच्या प्रवासात हुबळी-सांगली-पुणे अशी ट्रेन धावेल. ही ट्रेन दर बुधवार, शुक्रवार, रविवारी हुबळीहून पहाटे 5 वाजता सुटेल.

 

तर, धारवाडला पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी येईल. बेळगावात सकाळी 6.55, सांगली 9.30 आणि पुण्यात 1.30 वाजता पोहोचणार आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *