हिंगोली जिल्ह्यातील 25 एप्रिल रोजीची स्थानिक सुट्टी रद्द

Cancellation of local holiday on 25th April in Hingoli district

 

 

 

 

हिंगोली जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सन 2024 या वर्षासाठी गुरुवार, दि. 25 एप्रिल, 2024 रोजी हजरत सिरेहक शाह बाबा रहेमतुल्ला अल उर्फ चिरागशहा दर्गा संदल ऊर्स हिंगोली,

 

 

 

बुधवार‍ दि. 11 सप्टेंबर, 2024 साठी ज्येष्ठा गौरीपूजन (महालक्ष्मी) व गुरुवार दि. 31 ऑक्टोबर, 2024 रोजी नरक चतुदर्शी याप्रमाणे तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या होत्या.

 

 

 

हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान दि. 26 एप्रिल रोजी असल्याने मतदानाच्या सुट्टीसह 25 ते 28 एप्रिलपर्यंत सलग चार दिवस शासकीय सुट्या येत आहेत.

 

 

 

 

हिंगोली जिल्ह्याच्या लोकसभा मतदानाच्या टक्केवारीवर या सुट्ट्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दि. 25 एप्रिल, 2024 रोजीची स्थानिक सुट्टी रद्द केल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *