रेल्वेचा ब्लॉक, मराठवाड्यातून धावणाऱ्या काही गाड्या रद्द

Railway block, some trains running from Marathwada are cancelled

 

 

 

 

नांदेड रेल्वे विभागामध्ये रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी रोलिंग ब्लॉक घेण्यात येत आहे. मराठवाड्यातून धावणाऱ्या नऊ रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

 

 

नांदेड रेल्वे विभागामध्ये रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी रोलिंग ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यातून धावणाऱ्या नऊ रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

 

 

…रोलिंग ब्लॉकमुळे परभणी ते नांदेड या मार्गावर चालणारी रेल्वे क्रमांक ०७६७२ ही विशेष रेल्वे १९ ते ३१ डिसेंबर यादरम्यान रद्द करण्यात आली आहे.

 

 

 

याशिवाय १७६८८ धर्माबाद-मनमाड ही रेल्वे २०, २४, २७ आणि ३१ डिसेंबर या दिवशी धर्माबाद ते नांदेड दरम्यान रद्द करण्यात आली आहे. ०७७७८ मनमाड ते नांदेड ही रेल्वे १९ आणि ३१ डिसेंबरला पूर्णा ते नांदेडदरम्यान रद्द करण्यात आली आहे.

 

 

१७६६१ काचिगुडा-नगरसोल ही रेल्वे १९, २३, २६ आणि ३० डिसेंबर रोजी मुदखेड ते मानवतदरम्यान २४० मिनिटे उशिराने धावेल.

 

 

१७६१७ मुंबई-नांदेड रेल्वे १९, २३, २६ आणि ३० डिसेंबरला जालना ते सेलूदरम्यान १३५ मिनिटे उशिराने धावेल, १२७८८/१७२३२ नगरसोल ते नरसापूर ही रेल्वे १९, २३, २६ आणि ३० डिसेंबरला जालना ते सेलूदरम्यान १०५ मिनिटे उशिराने धावेल.

 

 

 

१७६३० नांदेड ते पुणे १९, २३, २६ आणि ३० डिसेंबरला नांदेड ते मानवतदरम्यान ९० मिनिटे उशिराने धावेल. १७४०९ आदिलाबाद ते नांदेड रेल्वे १२ आणि १९ डिसेंबरला किनवट ते मुदखेडदरम्यान ९० मिनिटे उशिराने धावेल.

 

 

रोलिंग ब्लॉकमुळे १७६५० छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद एक्स्प्रेस ही रेल्वे १९, २१, २३, २६, २८ आणि ३० डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर येथून तिच्या नियमित वेळेपेक्षा १२५ मिनिटे उशिरा सुटणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *