बापरे…!! कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर मुलीचा आवाजच गेला;तुम्हीही मुलांची काळजी घ्या !

Bapre...!! After getting infected with corona, the girl's voice disappeared; take care of the children too!

 

 

 

 

कोरोनाच्या नवीन लक्षणांमध्ये घशाची खवखव होत असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. यामुळे आवाज जाण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत होती. आता अमेरिकेत असंच एक प्रकरण समोर आलं आहे. कोविड-19 मुळे एका 15 वर्षांच्या मुलीचा आवाज गेला आहे.

 

 

 

अमेरिकेतील एका रुग्णालयात 13 दिवसांपूर्वी या तरुणीला दाखल करण्यात आलं होतं. तिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं,

 

 

तसंच तिला श्वास घेण्यातही अडचण येत होती. यानंतर हळू-हळू तिचा आवाज गेला. एंडोस्कोपिक चाचणीत असं दिसून आलं की तिला बायलॅटरल व्होकल पॅरालिसिस झाला आहे.

 

 

मासाचुसेट्स आय अँड इअर हॉस्पिटलमधील संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले . यामध्ये हे पॅरालिसिस अन्य आजारामुळे नाही,

 

 

तर कोरोनामुळेच झाल्याचा निष्कर्ष समोर आला. पीडियाट्रिक्स नियतकालिकामध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे. दि हिंदूने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

 

 

 

“लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो आहे. अशा वेळी, या नव्या लक्षणांकडे अधिक काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. या मुलीला आधी दम्याची लागण झाली होती.

 

 

त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येणं हे त्याचं लक्षण समजलं जात होतं. मात्र, हे कोरोनामुळे होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. अशाच प्रकारचा गैरसमज

 

 

इतर रुग्णांच्या बाबतीत देखील होऊ शकतो. त्यामुळे विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे.” असं मत या संशोधनाचे मुख्य ऑथर डॅनियल लॅरो यांनी व्यक्त केलं.

 

 

 

या मुलीवर उपचारांसाठी सुरुवातीला स्पीच थेरपीची मदत घेण्यात आली. मात्र, तरीही तिचा आवाज परत आला नाही. यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करुन विंडपाईपमध्ये छिद्र करण्यात आले, ज्यामुळे तिला पुन्हा पहिल्याप्रमाणे श्वास घेता योऊ लागला. सुमारे 15 महिने तिच्यावर उपचार सुरू होते.

 

 

 

“कोरोनामुळे लहान मुलांमध्ये लाँग-टर्म न्यूरोट्रोफिक परिणाम होऊ शकतात हे डॉक्टरांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने सर्वांनी उपचार करताना खबरदारी घ्यावी” असं मत या संशोधनाचे दुसरे लेखक ख्रिस्तोफर हार्टनिक यांनी व्यक्त केलं.

 

 

दरम्यान मुंबईत आढळणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांमध्ये साध्या तापाची लक्षणे दिसू लागली आहेत. सर्दी, ताप आणि अंगदुखीच्या तक्रारी घेऊन रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

 

 

 

लक्षणे पाहून डॉक्टर चाचण्यांचा सल्ला देत आहेत. काही रुग्ण घरीच स्वत:ची चाचणी करून पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधत आहेत.

 

 

 

कोरोनाचा नवा ‘जेएन.१’ व्हेरियंट सापडल्‍यानंतर सरकार आणि प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या घाबरण्यासारखी स्थिती नसली तरी,

 

नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. येत्या काही आठवड्यांत प्रकरणांमध्ये किंचित वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

रुग्ण तीन ते पाच दिवसांत बरे होतात; परंतु अशक्तपणा दूर होण्यास १५ दिवसांचा कालावधी लागतो, असे ब्रीच कॅण्डी रुग्णालयाचे अंतर्गत औषध विशेषज्ञ डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले.

 

 

आमच्याकडे उपचारासाठी आलेल्‍या एकाही रुग्‍णाला रुग्‍णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही, असे वोक्हार्ट हॉस्पिटलचे डॉ. बेहराम पार्डीवाला म्‍हणाले.

 

 

अलीकडेच आलेला एक रुग्‍ण अवघ्‍या एका दिवसात बरा झाला, असे हिंदुजा हॉस्पिटलचे सीईओ डॉ. जॉय चक्रवर्ती यांनी सांगितले.

 

 

सोमवारी राज्यात १,१६२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी २८ रुग्णांना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. मुंबईत ५२ जणांची चाचणी करण्यात आली.

 

 

त्यांपैकी १३ रुग्‍ण पॉझिटिव्ह आढळले. सध्या मुंबईचा सकारात्मकता दर १०.४ टक्के आहे. राज्याच्या सकारात्मकतेच्या दरापेक्षा तो अधिक आहे.

 

 

 

राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १६८ वर पोहोचली असून त्यांपैकी ७६ मुंबईतील आहेत. सध्या राज्यात एकूण ११ रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यापैकी नऊ मुंबईतील आहेत. मुंबईतील ५५ टक्के रुग्णांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्‍य विभागाने दिली.

 

 

बूस्टर डोस घ्‍यायचा राहिला असल्‍यास तातडीने घ्‍यावा. मॉल, थिएटर, पार्क वा कार्यालयात मास्क वापरणे आवश्यक आहे. लक्षणे आढळल्यास तपासणी करा.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *