समीर दूधगावकरांच्या कुकरने वाढवले महायुती,आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे टेन्शन !

Sameer Dhudhagaonkar's cooker increased the tension of the candidates of the Maha Alliance and the Maha Vikas Aghadi!

 

 

 

                                                                   

 

परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर गणेशराव दुधगावकर यांच्या कुकरने शिवसेना आणि महायुतीच्या उमेदवारांचे प्रेशर वाढवले आहे.

 

 

 

समीर दुधगावकर यांच्या प्रचाराच्या धडाक्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली असून ,मतदारसंघात तिरंगी लढत होताना दिसत आहे .

 

 

 

परभणी लोकसभा मतदारसंघाची ओळख शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून आहे. शिवसेनेत बंडखोरी होऊन शिंदे यांच्या शिवसेनेचा उदय झाला आणि शिवसेनेचा धनुष्यबाणासह संपूर्ण शिवसनाचं शिंदेंची झाली.

 

 

 

त्यानंतर परभणीचा हा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून घेण्यासाठी भाजप वर्षापासून प्रयत्न चालविले , तशी तयारीही केली होती.

 

 

 

परभणी लोकसभा भाजप लढविणारच असे सर्वांनाच वाटत होते ,परंतु ऐनवेळी राजकीय तडजोडीत महायुतीकडून महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली.

 

 

 

 

तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून खासदार बंडू जाधव यांना उमेदवारी मिळणार हे निश्चितच होते आणि झालेही तसेच.

 

 

उमेदवारी दाखल करण्यापासून उमेदवारी परत घेण्यापर्यंत मतदारसंघात सरळ- सरळ दुरंगी दिसणारी लढत समीर दुधगावकरांच्या उमेदवारीने तिरंगी झाली आहे.

 

 

 

 

 

एकंदरीत दुधगावकरांच्या कुकरणे दोन्ही उमेदवारांची प्रेशर वाढविले असेच म्हणता येईल . महाविकास आघाडी आणि महायुतीच्या दोन उमेदवारांमध्ये होणारी हि लढत तिरंगी झाल्यामुळे रंगात वाढली आहे.

 

 

 

शिवसेनेचे बंडु जाधव यांचे दोन टर्मची खासदारकीचा कार्यकार त्यामुळे अँटि इन्कबंसी असणारच तर दुसरीकडे महायुतीने मतदारसंघात भाजपचा उमेदवार न देता राजकीय तळजळीत ही जागा रासपचे महादेव जानकर यांना सोडली .

 

 

 

भाजपकडून स्थानिक नेत्यांच्या नावांची चर्चा होती परंतु वरच्या पातळीवरून सर्वकाही घडल्यामुळे स्थानिक नेत्यांचा पक्षीय पातळीवर कोणी विचारच झाला नसल्याची माहिती आहे.

 

 

 

त्यामुळे भाजपचा मतदारही तेवढा काही आनंदी दिसत नाही ,तर दुसरीकडे जानकर बाहेरचे असल्याने त्यांना मतदारसंघाची भौगोलिक पार्श्वभूमी ही समजण्यासाठी वेळ लागणार आहे.

 

 

 

अशा स्थितीत समीर दुधगावकरांनी निवडणुकीत अपक्ष म्हणून घेतलेल्या एन्ट्रीने आता सामना तिरंगी होणार हे निश्चित झाले आहे.

 

 

 

दुधगावकर हे जिल्ह्यातील सुपुत्र तसेच त्यांना राजकीय घराणेशाहीची पार्श्वभूमी, उच्चशिक्षित ,तरुण ,संयमी आणि अभ्यासू म्हणून त्यांची जिल्ह्यात असलेली ओळख .

 

 

 

 

वडील माजी मंत्री ,खासदार म्हणून राहिलेले ,शैक्षणिक संस्थांचे जाळे,जनसंपर्क यामुळे समीर धुधगावकरांना हलक्यात घेणे परवडणारे नाही.

 

 

 

पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत . ठीक ठिकाणी त्यांना प्रतिसादही मिळत आहे.

 

 

आपल्या मुलासाठी जिल्ह्यातील राजकीय दिग्गज गणेशराव दुधगांवकरही प्रचारात उतरले आहेत,सगे -सोयरे ,राजकीय संबंधत वापर ते करताना दिसत आहेत.

 

 

 

 

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्याकडून कोणती भूमिका घेण्यात येते आणि ते कोणाला मतदान करण्याचे आवाहन करतात यावर हि बरेच काही अवलंबून आहे.

 

 

 

 

एकंदरीत जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. निवडणुकीत रंगत निर्माण झाली असून या लढतीत कोणाचा विजय होतो हे शेवटी मतदारसंघातील मतदारच ठरवतील एवढे मात्र खरे !

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *