जागोजागी पंकजाताई मुंडे यांना प्रचारात भरघोस प्रतिसाद
Pankajatai Munde received a huge response in the campaign

३९ बीड लोकसभा निवडणुकीचे रणांगण चांगलेच गाजले आहे. महायुती कडून .पंकजा मुंडे तर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे व वंचित बहुजन कडून अशोक हिंगे
अशी तिरंगी लढत आपल्याला बघायला मिळत आहे. यातच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री राहिलेल्या गोपीनाथराव मुंडे
साहेबांच्या कन्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात
जिल्ह्यात विकास कामांचा महापूर आणला आहे त्यामुळे पंकजाताई मुंडे यांना प्रचारात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे भारतीय जनता पार्टीचे व महायुतीचे डॉ ऋषिकेश विघ्ने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
बीड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहिली असता सध्या जिल्ह्याच्या विकास करणाऱ्या उमेदवाराला जनता पसंत करत आहे. बीड जिल्ह्यातील जनतेच्या मागण्या स्पष्ट व योग्य पद्धतीने
संसदेत मांडल्या जातील व जिल्ह्याचा विकास दुपटीच्या वेगाने होईल. बीड जिल्ह्यात महायुतीने सर्वात जास्त विकासकामे केलेली आहेत आणि ती अशीच चालू रहावीत
व बीड जिल्ह्याचा फक्त आणि फक्त विकास होईल ह्याकडे जनतेने लक्ष देण्याची सध्या गरज आहे.जलशिवार योजना सारख्या जिल्ह्याची दिशा बदलणाऱ्या संकल्पना पंकजाताई मुंडे यांनी
या राज्यात राबविल्या जेणेकरून दुष्काळी भाग देखील सुजलाम सुफलाम होतील. पंकजाताईंची भाषणकौशल्याची
ताकातीने बीड जिल्ह्याचे नाव
देशाच्या पटलात प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नसल्याचे भारतीय जनता पार्टी चे डॉ ऋषिकेश विघ्ने यांनी सांगितले .