हज यात्रेला संभाजीनगर एयरपोर्ट पेक्षा मुंबई एयरपोर्टवरून हाजींना ८८ हजार रुपये भाडे कमी
The Hajj fare from Mumbai airport is Rs 88 thousand less than Sambhajinagar airport

गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या हाजींना ८८ हजार रुपये जादा मोजावे लागले होते. यंदाच्या वर्षी हज यात्रेकरूंनी हज यात्रेसाठी
मुंबई एम्बार्केशनला पसंती दिल्यास २०२४ च्या हज यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगरहून आंतरराष्ट्रीय विमानाचा प्रवास बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हज कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने हज २०२४ साठी हज यात्रेला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या भाविकांकडून ऑनलाईन अर्ज मागविले होते. त्यासाठी चार डिसेंबर ते २० डिसेंबर अशी मुदत देण्यात आली होती.
चार ते २० डिसेंबर या काळात जिल्हयातून फक्त ८०० च्या जवळपास अर्ज आले आहेत. जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरासह तालुक्यातून अनेक जणांनी हज यात्रेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत.
हज यात्रेसाठी एम्बार्केशन पॉइट निवडण्याची मुभा ही यात्रेकरूंना देण्यात येत असते. एम्बार्केशन पॉइंटमध्ये राज्यातून मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन शहरांचा समावेश असतो.
गेल्या वर्षी हज यात्रेला एम्बार्केशन पॉइंट छत्रपती संभाजीनगर असे दिले होते. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून एकूण तीन हजार ७१५ हज यात्रेकरूंचा प्रवास झालेला आहे.
मात्र, छत्रपती संभाजीनगर एम्बार्केशन पॉइंट निवडलेल्या हाजींना मुंबईहून जाणाऱ्या हाजींपेक्षा ८८ हजार रुपये प्रती प्रवासी जादा मोजावे लागले. अचानक हज यात्रेचा खर्च हा ८८ हजार रुपये वाढल्याने, अनेकांनी हज यात्रा रद्द केली.
हा पुर्वानूभव समोर आल्यानंतर यंदा वर्ष २०२४ साठी अर्ज भरणाऱ्यांनी एम्बार्केशन पॉइंट हा मुंबई ठेवला आहे. आतापर्यंत आलेल्या हाजींच्या अर्जातून ९० टक्केच्या वर हाजींनी
मुंबई एम्बार्केशन पॉइंट मागितला असल्याने आगामी वर्षात हज यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगरहून जाणारे एकमेव आंतरराष्ट्रीय विमानाचा प्रवास बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हज यात्रेसाठी विमान प्रवासासाठी निवीदा काढण्यात येत असते. या निविदेत एम्बार्केशन पॉइंटवरून किती जणांनी अर्ज भरलेले आहेत.
याची पाहणी करून विमान कंपनी निविदेत भाग घेत असतात. गेल्या वर्षी अचानक ८८ हजार रुपये प्रती प्रवासी वाढविण्यात आल्याने, गेल्या वर्षी अनेकांनी एम्बार्केशन पॉइंट बदलण्याची मागणी केली होती. एम्बार्केशन पॉइंट बदलण्यात आलेले नव्हते.
असे होते प्रति प्रवासी दर
वर्ष २०१९
एकूण दर विमानभाडे
छत्रपती संभाजीनगर – २,४०,०५० ८०,९८७
मुंबई – २,४०,९०० ६७,८४३
नागपूर २,४२,५५० ६९,४९६
वर्ष २०२२
एकूण दर विमानभाडे
छत्रपती संभाजीनगर – आंतराष्ट्रीय विमान सेवा रद्द
मुंबई – २,४०,९०० ६७,८४३
नागपूर आंतराष्ट्रीय विमान सेवा रद्द
वर्ष २०२३
एकूण दर विमानभाडे
छत्रपती संभाजीनगर – ३,९२,७३८ १,६०,४३०
मुंबई – ३,०४,८४३ ७१,८१२
नागपूर ३,६७,०४४ १,३४,६१५
(विमान भाड्यासह एकूण दर दिलेले आहेत. करोनामुळे वर्ष २०२०-२१ हज यात्रा रद्द करण्यात आली होती)
हज यात्रेसाठी चार डिसेंबर ते २० डिसेंबर या काळात कमी प्रमाणात हज यात्रेकरूंनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. यामुळे हज यात्रेसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ देण्यात यावी,
अशी मागणी फेडरेशन ऑफ हज पिलग्रिंम्स सोशल वर्कर्स ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आली होती त्यानंतर हज यात्रेसाठी अर्ज करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे.