अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार म्हणाले,’ मी काँग्रेस सोडणार नाही “

MLA close to Ashok Chavan said I will not leave Congress

 

 

 

माजी मुख्यमंत्री, सध्या राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे हे विधानसभेच्या आधी भाजपमध्ये प्रवेश करतील,

 

अशी चर्चा होती. हंबर्डे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर या चर्चांना अधिकच हवा मिळाली. यावरच मोहन हंबर्डे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विविध विकासकामांसाठी भेटलो होतो. यावेळी माझ्यासोबत नांदेडचे शिष्टमंडळ होते. या भेटीत

 

कोणतीच राजकीय चर्चा झाली नाही. विकासकामे घेऊन जातो, त्यावेळी राजकीय चर्चा होण्याचा काहीही संबंध नाही, असे मोहन हंबर्डे म्हणाले.

 

त्याचवेळी मी काँग्रेसमध्येच राहणार असून भाजपमध्ये जाणार नाही, असा शब्द देतानाच माझ्यावर क्रॉस व्होटिंगचा खोटा आरोप लावण्यात आल्याचेही ते म्हणाले.

 

मी क्रॉस व्होटिंग केली नव्हती, हे मी पक्षातील वरिष्ठांना सांगितले. त्यानंतर मला कुठलीही नोटीस आली नाही आणि विचारणाही झाली नसल्याचे हंबर्डे यांनी सांगितले. त्याचवेळी माध्यमं माझ्याबाबत खोटी माहिती चालवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

 

लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला नाकारल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातही परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत.

 

सूर्यकांता पाटील यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर अशोक चव्हाण यांचे सख्खे दाजी भास्करराव पाटील खतगावकर

 

यांनीही भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे ठरवून दोन दिवसांत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. त्यांच्यासोबत त्यांची सून मीनल पाटील खतगावकर देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

 

नायगाव विधानसभा मतदारसंघातून त्या विधानसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यासोबत

 

जिल्ह्यातील बहुतांश काँग्रेस आमदार जातील, असे बोलले गेले. मात्र नांदेडच्या जनतेने भाजपला नाकारल्यानंतर आमदारांनीही आस्ते कदमचा पवित्रा घेतला आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *