जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक कुरुंदकर यांच्या ढिसाळ नियोजनामुळे , बँकेत शेतकऱ्यांची गुराढोरांसारखी स्थिती

Farmers are affected by the unplanned management of District Central Bank Manager Kurundkar

 

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पैसे काढण्यासाठी आलेले शेतकरी लाडक्या बहिणींची अक्षरशः गुरा ढोरासारखी वागणूक मिळत असल्याचे बँकेचे व्यवस्थापक व्यंकटेश कुरुंदकर यांच्या ढिसाळ नियोजनाबाबत शेतकरी, ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत

 

गेल्या काही दिवसापासून सरकारतर्फे शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाई ची मदत देण्यात सुरुवात झालेली आहे . सणासुदीच्या दिवसात

 

पैशांची चणचण भासत असल्यामुळे बँकेचे ग्राहक शेतकरी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत पैसे काढण्यासाठी येत असल्यामुळे बँकेत तोबा गर्दी झालेली आहे

 

बँकेत आलेल्या ग्राहकांना या गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, बँकेत हजारो माणसे अक्षरशा आत आणि बाहेर जनावर सारखी कोंबल्याप्रमाणे तासंन ताच रांगा लावून उभे आहेत

 

वयस्कर शेतकरी थेट जमिनीवर बसून आपला नंबर कधी येईल याची दिवसभर वाट पाहत आहेत, दररोज हजारो शेतकरी ग्राहक बँकेत येत असताना बँक बँकेत जाडा खिडक्या सुरु करण्याची गरज असतांनाही

 

तसे काहीच न करता, जणू आपण आपल्या खिशातून शेतकऱ्यांना पैसे देत असल्याचे दाखवत शेतकऱ्यांना अक्षरशः गुराढोरा सारखी वागणूक मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून बँकेचे व्यवस्थापक कुरुंदकर यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

 

सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असल्याने उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे, अशा स्थितीत आलेल्या ग्राहकांना

 

बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे, शेतकरी ,लाडक्या बहिणी ,निराधार तसेच विविध लाभार्थी महिला अक्षरशः जमिनीवर बसून दिवस काढत आहेत

 

बँकेच्या माध्यमातून बँकेत येणाऱ्या ग्राहकांना साधे पिण्याचे पाणी देखील उपलब्ध करून देण्याची तसदी बँकेचे व्यवस्थापक कुरुंदकर यांच्याकडून घेण्यात आलेली नाही

 

बँकेच्या आवारात पिण्याचे पाण्याची टाकी उभारण्यात आलेली आहे त्यात पाणी तर नाहीच नळाच्या तोट्याची गायब आहेत , त्यामुळे बँकेत येणाऱ्यांना पैसे खर्च करून पाणी प्यावे लागत आहे.

 

बँकेचे व्यवस्थापक कुरुंदकर यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका शेतकरी,महिला ग्राहकांना बसत आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खातेधारकांची संख्या नजरेसमोर ठेवून निदान मोजक्या सुविधा तरी देणे आवश्यक आहे परंतु व्यवस्थापकाच्या नियोजन शून्य कारभारामुळे ते होताना दिसत नाही

 

 

बँकेतर्फे दररोज वीस ते पंचवीस कोटी रुपयांचे वाटप होत आहे पण त्यासाठी अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून बँकेत येणाऱ्या ग्राहकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे

 

केंद्र व राज्य सरकारकडून निवडणूक आचारसंहितापूर्वी अनुदान विचारीत करण्यात आल्यामुळे अचानक बँकेत गर्दी वाढल्याचे तसेच नियमित पगारी असणाऱ्या शिक्षकांना याचा फटका बसत आहे

 

 

शिक्षकांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेमार्फत करण्यात यावा यासाठी वेळोवेळी निवेदन देऊनही ते होत नाही, आज शिक्षकांना स्वतःचेच पैसे घेण्यासाठी बँकेत तारेवरची कसरत करावी लागत आहे

 

त्यात गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या लाडकि बहीण ,निराधार,तसेच विविध योजनेच्या लाभार्थी महिला पैसे काढण्यासाठी महिलांची अफाट गर्दी बँकेतील अपुऱ्या सोयी सुविधा ,

 

उन्हाचा तडाखा ,प्यायला पाणी नाही, अशा गलथान कारभारामुळे बँकेत आलेले ग्राहक नियोजन शून्य कारभाराला जबाबदार व्यवस्थापक व्यंकटेश कुरुंदकर यांच्यावर कारवाईची मागणी करीत आहेत

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *