अशोक चव्हाण -मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट, दीड तास चर्चा

Ashok Chavan - Manoj Jarange met at midnight, discussed for one and a half hours

 

 

 

 

 

भाजप नेते अशोक चव्हाण आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यात रात्री अंतरवाली सराटी येथे दीड तास चर्चा झाली. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता अचानक अशोक चव्हाण हे अंतरवलीमध्ये दाखल झाले.

 

 

 

 

यावेळी आंदोलनस्थळाशेजारी असलेल्या एका घरात दोघांमध्ये ही चर्चा झाली. चर्चेदरम्यान मनोज जरांगे यांनी सरकारकडून दबाव आणून

 

 

 

 

आंदोलकांवर विनाकारण गुन्हे दाखल होत असल्याची कैफियत चव्हाणांसमोर मांडली. सरकारकडून सग्यासोयऱ्या बाबत फसवणूक झाल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.

 

 

 

दरम्यान, जरांगेंच्या मागणी बाबत चर्चा करून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे या भावनेने मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून नाही तर समाज म्हणून चर्चा केली. तसेच जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण आल्याचं यावेळी अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

 

 

 

 

मनोज जरांगे यांनी सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याची कैफियत अशोक चव्हाण यांच्यासमोर मांडली. सगसोयरे आरक्षणाची मागणी असताना सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी केली नाही.

 

 

 

 

मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याऐवजी नव्याने गुन्हे दाखल केले जात आहेत. यासोबतच समाजाच्या मागण्या आणि अडचणी अशोक चव्हाण यांच्यासमोर मांडल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.

 

 

 

आम्ही २४ मार्च रोजी समाजाची बैठक घेणार असून त्यात पुढील दिशा ठरवू असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.

 

 

 

 

भाजप नेते अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांच्यात शनिवारी रात्री आंतरवाली सराटीमध्ये दीड तास चर्चा झाली. रात्री साडेकरा वाजता अचानक अशोक चव्हाण हे आंतरवालीमध्ये दाखल झाले.

 

 

 

यावेळी आंदोलनस्थळा शेजारी असलेल्या एका घरात दोघांमध्ये चर्चा झाली. मनोज जरांगे यांनी सरकारकडून दबाव आणून आंदोलकांवर विनाकारण गुन्हे दाखल होत असल्याची कैफियत चव्हाणांसमोर मांडली.

 

 

 

सरकारकडून सगेसोयरेबाबत फसवणूक झाल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलंय. दरम्यान जरांगेंच्या मागणीबाबत चर्चा करून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे या भावनेने आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपण आल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

 

 

मनोज जरांगे आणि अशोक चव्हाण यांच्यात तब्बल दीड तास चर्चा सुरू होती. मनोज जरांगे यांनी सरकारकडून आंदोलकांवर दबाव आणून विनाकारण गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप अशोक चव्हाणांसमोर केला.

 

 

 

अनेकांना पोलीस प्रशासन विनाकारण चौकशीसाठी बोलवत असल्याचं देखील जरांगे यांनी अशोक चव्हाण यांना सांगितले. तसेच,

 

 

 

 

सरकारकडून बॅनर लावणारे, हलगी वाजवणाऱ्या लोकांवर देखील गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

 

 

 

दरम्यान या भेटीवर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, सरकारने फसवणूक केल्याचे आपण अशोकराव चव्हाण यांना सांगितले आहे.

 

 

 

सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचं देखील सांगितले. गुन्हे मागे घ्यायचे ठरलं असतांना उलट अधिक गुन्हे दाखल केले जात आहेत.

 

 

 

 

मागणीप्रमाणे हैदराबादचे गॅझेट्स घेतले नाही, यासह समाजाच्या मागण्या, प्रश्न, शासनाकडून होणारी फसवणूक याबाबत अशोक चव्हाण यांच्यासोमर मांडली आहे.

 

 

 

 

आता ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील. मात्र, आम्ही 24 मार्च रोजी मराठा समाजाची बैठक बोलाविली आहे. त्यात मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *