विधानसभा निवडणूक ;त्या पत्रामुळे महाविकास आघाडीत तणाव
Vidhan Sabha Election: Tension in Mahavikas Aghadi due to that letter
महाविकास आघाडीचा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मेळावा होत आहे. या मेळाव्यात महाविकास आघाडीतील नेते मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काय भाषण करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे,
ती म्हणजे एका शिवसैनिकानं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांना पाठवलेलं एक पत्र समोर आलं आहे.
’ महाविकास आघाडीतील इतर पक्ष शिवसेना ठाकरे गटाचा फक्त प्रचारासाठी वापर करून घेतील आणि स्व:ताच्या पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडूण आणतील. जे लोकसभा निवडणुकीत घडले.
त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गटाला मागे टाकेल.’ अशा इशारा देणारे
पत्र एका शिवसैनिकाने शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांना पाठवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत धूसफूस पुन्हा एकदा समोर आलीये.
जर उद्धवसाहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करत असेल महाविकास आघाडी तरच उद्धवसाहेबांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीसाठी प्रचारप्रमुख म्हणून कार्य करावे
अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा… जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावर त्यांचं लक्ष राहील आणि आपले शिवसेनेचे मशालीचेच जास्तीत जास्त आमदार निवडून येतील
आणि त्याच्या भरवशावरच आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळेल व महाविकास आघाडीतील दुसऱ्या अन्य घटक पक्षांची उगाचच प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाही…
लोकसभेला तसे केल्याने आपल्या जागा कमी झाल्या व काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला. त्यामुळे ते उगाचच प्रचार प्रमुखाची माळ गळ्यात घालतील आपल्या आणि त्यांचा फायदा करून घेतील…
मुख्यमंत्रिपदाची ऑफर महाविकास आघाडी न देता प्रचार प्रमुखाची ऑफर देत आहे. यातून त्यांचं वेगळं राजकारण दिसून येत आहे.
त्यामुळे आपण देखील सावध राहून एकत्रित जेव्हा सभा होतील तेव्हाच एकत्र प्रचारासाठी जावे अन्यथा आपल्या उमेदवारांचा आपण प्रचार करावा,
प्रत्येकाने आपल्या पक्षाचा प्रचार करावा असं ठरविण्यात यावे आणि तीच रणनीती ठेवावी..,’ असं या पत्रात म्हटलं आहे.