जरांगे पाटलांच्या उपोषणावर भाजप आमदार म्हणाले “नौटंकी’
BJP MLA calls Jarange Patil's hunger strike "a stunt"

मराठा समाजाला फसवून मनोज जरांगेंची उपोषणाची नौटंकी कशासाठी? असा सवाल करत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
राज्याला अस्थिर करण्यासाठीच मनोज जरांगे पाटील यांच्या आकाच्या आकाने उपोषणाची नौटंकी करायला सांगितले आहे का?
असा सवालही त्यांनी केला. कारण देवेंद्रजींनी आजवर मराठा समाजासाठी काय केले आहे, हे माहिती करुन घेण्यासाठी त्यांनी आजही चर्चेला यावे, असे वारंवार सांगून देखील जरांगे चर्चेला तयार नाहीत असे प्रसाद लाड म्हणाले.
मागील दोन महिन्यापासून महाराष्ट्र यशस्वीपणे वाटचाल करत आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची घोडदौड चालली आहे. दावोसमधून देवेंद्रजींनी महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींची गुंतवणूक आणली असल्याचे प्रसाद लाड म्हणाले.
या राज्यातील प्रकल्प मार्गी लागले आहेत. शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला. भगिनींना एक भाऊ म्हणून त्यांनी हात दिला असल्याचे लाड म्हणाले.
प्रत्येक समाजासाठी देवेंद्रजी प्रयत्न करत आहेत. मग समाजाला फसवून मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाचा नौटंकी कशासाठी करत आहेत? असा सवाल करत प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली.
देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यातील मराठा समाजासाठी काय काय केले हे आपण एकदा जनतेसमोर येऊन बोलू असेही प्रसाद लाड म्हणाले.
ही तुमची नौटंकी आणि तुमच्या आकाच्या आकाचे आदेश राज्याला अस्थिर करण्याचे आहेत का? असा सवाल देखील मनोज जरांगे यांना प्रसाद लाड यांनी केला आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी 25 जानेवारीपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे
आज 26 जानेवारीला सगेसोयरेची अधिसूचना काढून एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्ष झालं, मात्र समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जीआर काढून त्याचे तात्काळ वाटप करण्यात यावे.
ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सर्वच सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं असून जालना जिल्ह्यातील अंतरावली येथील त्यांच्या उपोषणाचा आज 2 रा दिवस आहे