आंतरराष्ट्रीय परिषदेत लाईफ सायन्स विषयावरील संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन

Publication of Reference Texts on Life Science in International Conferences

 

 

 

 

 

 

 

 

मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात सुरू असलेल्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक शास्त्रज्ञ,
तज्ञ प्राध्यापक, संशोधक व विज्ञान शाखेतील पदवीत्तर विद्यार्थ्यांच्या साक्षीने

 

 

 

प्राचार्य नानासाहेब गायकवाड,यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले. हा संदर्भ ग्रंथ यू.जी.सी. सी. एस.आय.आर NET आणि SET परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बहुउपयोगी ठरणार आहे.

 

 

 

 

वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, व जैवतंत्रज्ञान या चारही विषयाची तयारी करण्यास उपयुक्त ठरणार आहे. या संदर्भ ग्रंथाचे

 

 

 

 

संपादन वनस्पती शास्त्राच्या माजी  जेष्ठ प्राध्यापक डॉ. के. एन धुमाळ, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे तसेच डॉ. सय्यद इलियास, पुना कॉलेज, पुणे यांनी केले आहे.

 

 

 

 

 

या पुस्तकामुळे लाइफ सायन्सच्या देशभरातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना खूपच मदत होणार आहे, असे उद्गार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश खरडे यांनी काढले.

 

 

 

 

 

 

सर्व विद्यार्थी, प्रमुख पाहुणे तसेच वनस्पती शास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य यांनी संपादकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुस्तकात देशभरातील अनेक विद्यापीठे, महाविद्यालय,

 

 

 

 

 

संशोधन संस्था येथील ख्यातनाम आणि नामांकित प्राध्यापकांनी लेखन केले आहे. यात एकूण 13 युनिट व 96 चाप्टर
समाविष्ट केले आहेत

 

 

 

 

 

 

असे निराली प्रकाशनचे प्रमुख श्री. जिग्नेश फुरिया यांनी सांगितले. या पुस्तकाची त्वरित  नोंदणी केल्यावर पुस्तकाच्या मूळ किमतीवर 20 टक्के सवलत मिळणार आहे

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *