15 हजाराची लाच घेतांना कनिष्ठ अभियंत्याला अटक

Junior engineer arrested while accepting bribe of 15 thousand

 

 

 

 

 

गावात कंत्राटदारामार्फत करण्यात आलेल्या जलवाहिनी व नळ योजनेच्या थकीत बिलाची रक्कम काढून देण्यासाठी लाचेची मागणी केली.

 

 

 

 

१५ हजाराची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कनिष्ठ अभियंत्यासह एकास ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

लातूरच्या अहमदपूर येथील पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारा बळीराम सोनकांबळे व पंडित शेकडे या दोघाना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

 

 

पाटबंधारे विभागातील या दोघांनी गावात केलेल्या जलवाहिनी व नळ योजनेच्या कामाचे बिल काढून देण्यासाठी १५ हजार रुपयाची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

 

 

 

 

लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. यात तथ्य आढळून आल्यानंतर पथकाने सापळा रचला. दरम्यान १५ हजाराची लाच स्वीकारताना

 

 

 

 

 

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने या दोन्ही आरोपींना रंगेहात पकडले आहे. तर अहमदपूर पोलीस ठाण्यात या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *