नांदेडमध्ये इन्कमटॅक्स च्या 100 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून धाडसत्र;सर्वत्र खळबळ
A raid by a team of 100 Income Tax officers in Nanded; excitement everywhere
नांदेडच्या शिवाजीनगर परिसरात आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकर विभागाने एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले आहेत.
आयकर विभागाकडून पाच ते सात ठिकाणी झाडाझडती सुरु केली. आज सकाळी भंडारी फायनान्स यांच्याकडे आयकर विभागाने चौकशी सुरु केली आहे.
अली बाई टॉवर इथल्या दुकानात आणि आदिनाथ फायनान्स येथे 100 अधिकारी आणि सोबतच काही पथकं छापेमारी करत आहेत.
नांदेड शहरात आज पहाटे 5 वाजता आयकर विभागाने एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकून झाडाझडती सुरू केली. नांदेड शहरातील भंडारी फायनान्सच्या कार्यालयांसह भंडारी भावंडांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहेत.
नांदेड शहरातील शिवाजीनगर येथे भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे दोन कार्यालय, तसेच कोठारी कॉम्प्लेक्समधील कार्यालय, आदिनाथ पतसंस्था आणि पारसनगर येथील संजय भंडारी आणि त्यांच्या भावाच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले.
आयकर विभागाने पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, परभणी या ठिकाणच्या पथकांनी एकाच वेळी ही कारवाई सुरु केली आहे.
तब्बल 25 गाड्यातून आलेल्या जवळपास साठहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई सुरु केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केल्याने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.
नांदेडमध्ये भंडारी हे फायनान्सचा व्यवहार सांभाळत होते. त्यांच्याकडे या पथकाकडून झाडाझडती सुरु आहे. औरंगाबाद, मुंबई
आणि नाशिकमध्ये आयकर विभागातून केली जाणारी छापेमारी कशासाठी केली जात आहे, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.