हिंगोली लोकसभा ;पाचव्या दिवशी बारा उमेदवारांची उमेदवारी दाखल

Hingoli Lok Sabha: Nominations of twelve candidates filed on the fifth day

 

 

 

 

 

हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी पाचव्या दिवशी आज 12 उमेदवारांकडून 16 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.

 

 

 

 

हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला गुरुवार, दि. 28 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या मतदार संघासाठी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.

 

 

 

 

नामनिर्देशनपत्र वितरण व स्विकृतीच्या पाचव्या दिवशी 18 उमेदवारांना 71 अर्जांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 103 इच्छुक उमेदवारांना 374 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.

 

 

 

 

तर पाचव्या दिवशी आज बुधवार, दि. 03 एप्रिल रोजी 12 उमेदवारांनी 16 नामनिर्देशन अर्ज दाखल केली आहेत. त्यामुळे आतापर्यंत

 

 

दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या 26 झाली आहे. आज दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 

 

 

 

श्री. नागेश बाबूराव पाटील आष्टीकर (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांनी दोन अर्ज, श्री. अनिल देवराव मोहिते (अखिल भारतीय परिवार पार्टी) यांनी एक अर्ज, श्री. मनोज आनंदराव देशमुख (अपक्ष) यांनी

 

 

 

एक अर्ज, श्री. बाजीराव बाबुराव सवंडकर (अपक्ष) यांनी तीन अर्ज, श्री. रवि यशवंतराव शिंदे (अपक्ष) यांनी एक अर्ज, श्री. अशोक वामनराव पाईकराव (अपक्ष) यांनी

 

 

 

 

एक अर्ज, श्री. अलताफ अहेमद (इंडियन नॅशनल लिग) यांनी दोन अर्ज, श्री. संजय श्रावण राठोड (अपक्ष) यांनी एक अर्ज, श्री. अशोक पांडूरंग राठोड (अपक्ष)

 

 

 

यांनी एक अर्ज, श्री. धनेश्वर गुरु आनंद भारती (अपक्ष) यांनी एक अर्ज, श्री. राजू शेषेराव वानखेडे (अपक्ष) यांनी एक अर्ज व श्री. शिवाजी मुंजाजीराव जाधव (अपक्ष) यांनी एक नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.

 

 

 

 

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह याकामी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असून उद्या गुरुवार, दि. 4 एप्रिल रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत सादर करता येतील.

 

 

 

 

शुक्रवार, दि. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 8 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *