शिवणकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त खुली बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

.Organization of open chess tournament on the occasion of Shivankar birth centenary year

 

 

 

 

 

 

 

परभणी :- बाल विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणीचे संस्थापक कै.म.शं.शिवणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त परभणी जिल्हा बुद्धिबळ संघटनेने एका भव्य, सर्वांसाठी खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

 

 

 

स्पर्धा 1 जून 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता सुरू होईल आणि 2 जून 2024 रोजी सायंकाळी 4.00 वाजता पारितोषिक वितरण समारंभाने स्पर्धेचा समारोप होईल.

 

 

 

शुभमंगल कार्यालय, पाथरी रोड, परभणी या ठिकाणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांची राहण्याची व्यवस्था याच कार्यालयात निशुल्क करण्यात आलेली आहे.

 

 

 

स्पर्धा सर्वांसाठी खुली असली तरी विविध गटांमध्ये एकूण रु. 50000 (रू.पन्नास हजार फक्त) ची रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत.

 

 

 

 

7 , 9 ,11 ,13 आणि 15 वर्षाखालील गटातील खेळाडूंना, तसेच महिला आणि वरिष्ठ नागरिक या गटांमध्ये प्रत्येकी पाच पारितोषिके देण्यात येणार आहेत.

 

 

 

 

खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक रुपये 10 हजार, द्वितीय रुपये 7 हजार , तृतीय रुपये 5 हजार अशी एकूण रोख रकमेची 12 पारितोषिके असतील.

 

 

 

 

पहिल्या पाच क्रमांकांना स्मृतीचिन्ह देण्यात येईल. रोख रकमेची 33 पारितोषिके आणि 40 स्मृतीचिन्ह अशी एकूण 47 खेळाडूंना पारितोषिके प्रधान करण्यात येतील. प्रत्येक सहभागी खेळाडूला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

 

 

अधिक माहितीसाठी अनिल शेलगावकर 9420193717 संभाजी बिल्पे 9420192979 यांच्याशी संपर्क साधावा.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *