AMIM चे मुदसिर असरार यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

AMIM's Mudasir Asrar joins Vanchit Bahujan Aghadi

 

 

 

कूल हिंद मजलीस इतेहादुल मुसलीमिन परभणी चे जिल्हा कार्याध्यक्ष मुदसिर असरार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन.

 

जिल्ह्यातील अनेक समस्या वर व येणाऱ्या महानगरपालिका बद्दल त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.

 

याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता तय्यब जफर हे उपस्थित होते. मुदसिर असरार हे. कुल हिंद मजलिस इतेहादुल मुसलेमीन परभणीचे जिल्हा कार्याध्यक्ष होते

 

ते कार्यअध्यक्ष असताना परभणीमध्ये मजलिस करिता त्यांनी मोठे योगदान दिले व मजलीस वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता

मजलीस मध्ये वाढत्या कुरबुरी व राज्यातील वरिष्ठ नेत्यांमधील रस्स्सीखेच पाहता त्यांनी हा निर्णय घेतला
जेव्हा आपण सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देऊ शकत नाही

 

सामान्य कार्यकर्त्यासहित लोकांच्याही विश्वासाला तडा बसत असल्यामुळे व वरिष्ठ नेत्यांनाही या सर्व गोष्टींचा काही फरक पडत नसल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याची कबुली दिली.

 

फुले शाहू आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र व संविधानावर विश्वास ठेवणारे लोक यांच्या हितासाठी विशेष म्हणजे संविधानाचे रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष निवडला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

जातीवादी पक्ष संविधान संपवण्याच्या मार्गावर असल्याकारणाने. संविधान वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या पक्ष सोबत राहणे व त्या पक्षाची ताकद वाढविणे ही काळाची गरज आहे

 

जेणेकरून येणारी पिढी या जातीवादी पक्षाच्या षडयंत्रापासून सावध राहावे. सविधानची रक्षा हवी म्हणून हे पावले उचलले आहे सर्व पक्ष आज जातीवादी पक्षांसोबत हात मिळवणी करून त्यांना ताकद देण्याचे काम करत आहे

 

हि खंत मनामध्ये अनेक दिवसापासून संविधान रक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यासोबत काम करण्याचा आनंद आहे व समाधान ही आहे .पक्ष वाढविण्याकरिता सदैव प्रयत्नशील राहु अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *