छोट्या दुकानदारांना मोठा दिलासा… रिटर्न फाईल करण्याचा नियम बदलला
Big relief for small shopkeepers... This rule of return filing has changed

देशभरातील छोट्या व्यावसायिकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला असून आता जीएसटी रिटर्न भरण्याचा नियम बदलला आहे. छोटे व्यावसायिक किंवा दुकानदारांना केंद्र सरकारकडून नवीन वर्षाची भेट देण्यात आली.
आता दोन कोटी रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या छोट्या करदात्यांना फॉर्म GSTR-9 भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांना हा फॉर्म वार्षिक रिटर्नसाठी भरला जातो.
सामान्य करदाता म्हणून नोंदणी केलेल्या प्रत्येक व्यक्तीला फॉर्म GSTR-9 भरावा लागेल तर आता छोट्या व्यापाऱ्यांना फॉर्म भरावा लागणार नाही.
अर्थ मंत्रालयाने आपल्या अधिकृत X वर ट्विट करून माहिती दिली. अर्थ मंत्रालयाने या निर्णयाच्या संदर्भासाठी अधिसूचना क्रमांक ३२/२०२३-CT उद्धृत केला असून अधिसूचना अर्थ मंत्रालयाने ३१ जानेवारी २०२३ रोजी जारी केली होती.
अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात जीएसटी रिटर्न भरणाऱ्यांच्या संख्येत ६५% वाढ झाली असून एप्रिल २०२३ पर्यंत १.१३ कोटी झाली आहे. जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत करदात्यांची संख्या १.४० कोटींवर पोहोचली आहे,
जी एप्रिल २०१८ मध्ये फक्त १.०६ कोटी होती. एप्रिल २०१८ मध्ये GSTR-3B फाइल करणाऱ्यांची संख्या ७२.४९ लाखांवरून एप्रिल २०२३ पर्यंत १.१३ कोटी झाली असून
नोव्हेंबरमध्ये मासिक जीएसटी संकलन १.६८ लाख कोटी रुपये होते. उल्लेखनीय आहे की चालू आर्थिक वर्षात मासिक सकल जीएसटी संकलन १.६० लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची ही सहावी वेळ आहे.
अर्थमंत्रायाने सांगितले की जीएसटी नियम आणि कार्यपद्धती बदल्लयाने लोकांमध्ये रिटर्न भरण्याचा उत्साह वाढला आहे. चालू आर्थिक वर्षात ९०% पात्र करदात्यांनी महिन्याच्या अखेरीस रिटर्न भरले असून २०१७-१८ मध्ये जीएसटी लागू होण्यापूर्वी हा आकडा केवळ ६८% होता.
अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही लोकसभेत जीएसटी डेटा जाहीर करताना आनंद व्यक्त केला. १ जुलै २०१७ पासून देशभरात जीएसटी लागू करण्यात आला ज्यात उत्पादन शुल्क, सेवा कर आणि व्हॅट यांसारख्या डझनहून अधिक स्थानिक करांचा समावेश करण्यात आला होता.