१२ हजार रुपयाची लाच घेतांना नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याला अटक
The chief officer of the city council was arrested while accepting a bribe of 12 thousand rupees

जळगाव जामोद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगरपरिषदेचे विद्यूत पर्यवेक्षक अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यामध्ये अडकले. बिल अदा केल्याने ठेकेदाराकडून १२ हजार रुपयांची लाच घेताना या दोघांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
जळगाव जामोद शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाचे बिल टाकले होते. हे बिल अदा केल्याचा मोबदला म्हणून संबंधित ठेकेदाराकडून मुख्याधिकारी आणि विद्युत पर्यवेक्षक या दोघांनीही लाच मागितली होती.
१२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची मानसिकता नसल्यामुळे या संबंधीची तक्रार ठेकेदाराने अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती.
एसीबीच्या पथकाने आज सकाळी ११ वाजेच्या सुमारात सापळा रचून जळगाव जामोदचे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे आणि नगरपरिषदेचे विद्युत पर्यवेक्षक दीपक शेळके
या दोघांना तक्रारदाराकडून बारा हजार रुपयांची लाच घेताना नगरपरिषदेतच्या आवारातच रंगेहात पकडले. विशेष म्हणजे आरोपी मुख्याधिकारी
आणि विद्युत पर्यवेक्षक हे दोन्ही तरुण असून आकाश डोईफोडे हा अहमदनगर जिल्ह्यातील तर दीपक शेळके हा मोताळा तालुक्यातील उबाळखेडचा मूळ रहिवासी आहे.