बाबाजानी दुर्रानी यांची पुन्हा विधानपरिषदेवर जाण्यासाठी कसोटी लागणार
Babajani Durrani will face a test to get back to the Legislative Council

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. या विधानपरिषदेची जागा मिळवण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे.
भाजप प्रदेशकडे आतापर्यंत 35 जणांनी अर्ज केले आहेत. भाजपचे पाच उमेदवार निवडून येतील इतकी मते भाजपकडे आहेत, पण भाजपकडे आतापर्यंत 35 इच्छुकांनी अर्ज केले आहे.
मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट),
रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सावंत (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे.
भाजप प्रदेशकडे आलेल्या अर्जावर पुन्हा एकदा कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर यादी दिल्लीला पाठवली जाणार आहे.
भौगोलिक, सामाजिक समीकरण निकषावरच उमेदवारी दिली जाणार आहे. संघटनेतील सक्रिय पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशकडे विधानपरिषदेची मागणी केली आहे.
दरम्यान, या विधानपरिषदेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळं आता भाजप श्रेष्ठी विधानपरिषदेची माळ कोणा कोणाच्या गळ्यात टाकते ते पाहावं लागेल.
राज्यसभेनंतर विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर 2 जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
16 जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता विधानसभेचे संख्याबळ घटल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे.
भाजपचा पाच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल. शिंदे गट आणि अजित पवार गटही प्रत्येकी दोन जागांसाठी प्रयत्नशील आहेत. याचाच अर्थ महायुती 9 जागांसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर परभणीचे दिग्गज नेते आणि विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार सोबत जाण्याचा निर्णय घेतला,
लोकसभा निवडणुकीतही “मोदी साब को तिसरी बार देश का प्रधानमंत्री बनाना है” असे सांगत त्यांनी महादेव जाणकारांचा प्रचार केला,जाणकार केले
पण मोदीसाब पुन्हा पंतप्रधान झाले आता बाबाजानी दुर्रानी यान विधानसभेची उमेदवारी मिळणार काय?याबाबत राजकीय गणिते मांडल्या जात आहेत.
अजित पवार त्यांना उमेदवारी देतील कि नाही हे सध्या गुलदस्त्यात आहे. बाबाजानी यांना विधानसभेच्या पुढच्या टर्म साठी संधी मिळणार की नाही ?याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे .
महायुतीकडून उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत आता कोणत्या गटाकडून कोणाला उमेदवारी मिळते याची चर्चा रंगली आहे
बाबाजानी दुर्राणी हे परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्याक चेहरा असून शरद पवार यांच्याकडून त्यांना वेळोवेळी विधान परिषदेवर संधी दिली गेली .
कधी स्थानिक स्वराज्य संस्था च्या माध्यमातून तर विधान परिषदेवर वेळोवेळी त्यांना संधी देण्याचे काम शरद पवारांनी केले.
राष्ट्रवादी फुटल्यानंतर दुर्रानी यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार सोबत जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटामध्ये सर्व काही अल्बेल दिसत नाही,
राष्ट्रवादी चे दिग्गज नेते आणि सर्वेसर्वा शरद पवार यांनी दहा जागा लढवून आठ जागेवर लोकसभेत उमेदवार विजयी केल्यामुळे त्यांचा बोलबाला महाराष्ट्रात सुरू आहे.
अजित पवार गटाकडे पुरेसे आमदार असले तरीही आमदारांमध्ये विधानसभा ईवडणुकीच्या दृष्टीने चल बीचल सुरु झालेली आहे ,
अशा परिस्थितीत आता विधानपरिषदेची कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायचे यावरून अजित पवारांची मोठी कसोटी लागणार आहे .
आमदारांच्या संख्येनुसार त्यांचे दोन जागा निवडून येऊ शकतात परंतु त्यांच्याकडे विधान परिषदेसाठी इच्छुकांची भली मोठी यादी असल्यामुळे आता त्या दृष्टिकोनातून कोणाकोणाला संधी भेटते यावर बरेच काही अवलंबून आहे,
परभणी जिल्ह्यातून राजेश विटेकर हे सुद्धा विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत त्यांना स्वतः अजित पवारांनी परभणीत पत्रकार परिषद घेत राजेश विटेकर यांना विधान परिषदेची संधी देण्यात येईल असे जाहीर केलेले होते,
त्यामुळे राजेश विटेकर हे आपला हक्क सांगत आहे तर दुसरीकडे बाबाजानी दुर्राणी यांचा कार्यकाळ आहे संपत आहे. त्यामुळे दुरानी यांना विधान परिषदेची उमेदवारी नाही भेटल्यास त्यांची आमदारकी संपुष्टात येईल.
एकंदरीत परभणी जिल्ह्यातून दोन जणांना विधान परिषद मिळणे अशक्य आहे . अजित पवार गटाचे आमदारांची संख्या पाहता त्यांचे दोन आमदार निवडून येऊ शकतात परंतु दोन्ही उमेदवार ते परभणी जिल्ह्यातून देणे अशक्य आहे .
अशा परिस्थितीत बाबाजानी दुर्राणी किंवा राजेश विटेकर या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल किंवा दोघांनाही नाकारत इतरांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
एकंदरीत हे चित्र पाहता बाबाजानी यांच्यासाठी धोक्याची घंटा दिसत आहे . आता काय राजकीय उलथापालथ होते ते पाहणे गरजेचे आहे