पोलीस अधीक्षकाकडून दोघा पोलिसांवर निलंबनाची कारवाई
The Superintendent of Police has suspended two policemen

आर्थिक देवाणघेवाण करीत प्रकरण परस्पर निकाली काढण्याचे प्रकार नवे नाही. पोलीस खात्यावर असे आरोप नेहमी होत असल्याचे चित्र आहे.
ते बदलण्याचा चंग बांधणाऱ्या पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दोन पोलिसांना निलंबित करीत कायद्याचा वचक निर्माण करण्याचा धडा दिला आहे.
हिंगणघाट येथे काही युवकांना अमली पदार्थाचे सेवन करताना ताब्यात घेण्यात आले होते. पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. हे प्रकरण काही पोलीस कर्मचाऱ्यांनी परस्पर आर्थिक व्यवहार करीत सोडून दिल्याची चर्चा रंगली होती.
पोलीस निरीक्षक मारुती मूलक यांनी या प्रकरणात चौकशी सुरू केली. त्यात तथ्य आढळून आले. पोलीस अधीक्षक हसन यांनी प्रकरण परस्पर निपटल्याचा ठपका ठेवत
शहर मार्शल पथक प्रमुख विवेक बनसोड व पोलीस नाईक पंकज घोडे यांना तत्काळ निलंबित केले. तसेच हवालदार प्रशांत वाटखेडे आणि सौरव गेडाम या दोघांना पोलीस मुख्यालयात बदलीवर पाठविण्यात आले आहे.