वार्षिक तबलिगी इज्तेमा निमित्त वाहतूक मार्गात तात्पुरता बदल
Temporary change in traffic route for annual Tablighi Ijtema

परभणी येथील जिंतूर रोड बायपासजवळ वार्षिकी तबलिगी इज्तेमाचे 1 आणि 2 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले असल्यामुळे
सार्वजनिक ठिकाणाची रहदारी व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परभणी शहर वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात येत असल्याचे
जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जिंतूरकडून जिंतूर रोडने परभणी शहराकडे येणारी अवजड वाहतूक तसेच पाथरी रोडने परभणी शहराकडे येणारी अवजड वाहने
व सिंगणापूर फाटा येथून परभणी शहरातून पाथरी – जिंतूरकडे जाणारी अवजड वाहनांचे वाहतुकीस गुरुवार (दि.02) चे सकाळी 6 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यतच्या कालावधीसाठी अवजड वाहनांच्या रहदारीसाठी वाहतूक मार्ग बंद करण्यात येत आहे.
जिंतूर आणि पाथरीकडून परभणी शहराकडे येणारी अवजड वाहने, गंगाखेडकडून सिंगणापूर फाटा येथून परभणी शहरातून जिंतूर किंवा पाथरीकडे जाणारी अवजड वाहने,
वसमत कडून वसमत रोडने पाथरी व जिंतूरकडे जाणारी अवजड वाहनांची वरील कालावधीत वाहतूक बंद करण्यात येत आहे.
पाथरी रोडकडून परभणीकडे येणाऱ्या अवजड वाहनांनी मानवत, पाथरी, उमरी फाटा या पर्यायी, वळण रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गंगाखेड कडून सिंगणापूर फाटामार्गे परभणी शहरात येऊन जिंतूर किंवा मंठा व मानवतकडे जाणारी सर्व प्रकारच्या जड वाहनांनी परभणी शहरात न येता,
अवजड वाहनांनी उमरी फाटा, पाथरी, मानवत, देगाव फाटामार्गे जिंतूरकडे जाणा-या रस्ताचा वापर करावा.
जिंतूरकडून परभणीकडे येणाऱ्या अवजड वाहनांनी कौसडी फाटा, वालूर, मानवत, पाथरी, पोखर्णी फाटा,
उमरी फाटा या मार्गाचा वापर करावा. जालना, मंठ्याकडून परभणी शहरात येणारी अवजड वाहने देगाव फाटा येथून सेलू, मानवत, पाथरी, पोखर्णी फाटा, उमरी फाटा या रस्त्याचा वापर करावा.
बुधवार (दि.1) पासून गुरुवार (दि.2) पर्यंत वार्षिक तबलिगी इज्तेमा कार्यक्रम परभणी शहरातील पोलीस ठाणे नानलपेठ हद्दीत होत असल्याने
हा कार्यक्रम जिंतूर रोडवरील बायपास लगत होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक या कार्यक्रमासाठी वाहनांसह येणार आहेत.
या दरम्यान वाहतूक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना गुरुवारी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत रहदारीसाठी बंद करण्यात येत आहे.
त्यांनी पर्यायी वळण मार्गाचा वापर करणे आवश्यक असून, शहरात कार्यक्रमादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.