पाहा VIDEO;अधिकारी होण्यासाठी अभ्यासाचा घेतला ताण ! क्लास सुरु असतांनाच आला Heart Attack

To become an officer took the stress of studying! The heart attack came while the class was starting

 

 

 

 

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. कोंचिग क्लासमध्ये बसलेल्या एका विद्यार्थ्या अचानक मृत्यू झाला. शिक्षक शिकवत असताना बेंचवर बसलेल्या हा विद्यार्थी अचानक कोसळला

 

 

आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या विद्यार्थ्यााल कार्डिआक अरेस्ट आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेने कमी वयात हार्टअटॅकचं प्रमाण वाढत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

 

 

ही घटना मध्यप्रदेशमधल्या इंदौर इथली आहे. राजा लोधी असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो 18 वर्षांचा होता. राजा इंदौरमधल्या सागर जिल्ह्यात राहाणार होता.

 

 

राजा लोधी हा मध्यप्रदेश लोक सेवा आयोगाची तयारी करत होता. यासाठी त्याने कोचिंग क्लासही लावला होता. घटनेच्या दिवशीसुद्धा तो कोचिंग क्लासमध्येच होता.

 

 

 

शिक्षक शिकवत असताना अचानाक त्याच्या छातीत दुखु लागलं आणि तो बेशुद्ध झाला. वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी त्याला उचलून रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मन सु्न्न करणारी ही घटना कोचिंग क्लासमधल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

 

 

 

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत कोचिंग क्लासमध्ये राजा लोधी मन लावून शिकत असताना दिसतोय. त्याचवेळी अचानक त्याच्या छातीत दुखू लागतं. त्यानंतर तो आपलं डोकं समोरच्या बेंचवर ठेवतो.

 

 

बाजूला बसलेल्या विद्यार्थ्याला राजाला नक्की काय होतंय हे कळल नाही. त्याने राजाला उठवण्याचा प्रयत्न केला. काही सेकंदासाठी राजाने डोकं वर केलं पण त्यानंतर तो खाली कोसळला.

 

 

 

इतर विद्यार्थ्यांनी तात्काळ राजाला उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राजाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारापुर्वीच राजाचा मृत्यू झाला होता.

 

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार राजा लोधी बीएच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. पहिल्याच प्रयत्नात मध्यप्रदेश लोक सेवा आयोगाची परीक्षा पास करण्याचं त्याचं स्वप्न होतं.

 

 

तो एमपी पीसीएस परीक्षा 2025 तयारी करत होता. राजा अभ्यासही हुशार होता. त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजाने

 

 

अभ्यासाचा ताण असल्याचं कधी सांगितंल नव्हतं. तो दररोज व्यायामही करत होता. त्याला याआधी कसला त्रास नसल्याचंही त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.

 

 

 

हार्टअटॅकने तरुणांचा मृत्यू होण्यची मध्य प्रदेशमधली अलीकडच्या काळातील ही चौथी घटना आहे. तरुणांमध्ये सायलेंट हार्ट अटॅकच वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पोस्ट मॉर्टनंतर राजा लोधीच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *