नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण आघाडीवर

Vasant Chavan of Congress leading in Nanded

 

 

 

 

नांदेड लोकसभा मतदारसंघात चिखलीकरांचा विजय अत्यंत सोपा असेल, असा अंदाज सध्या तरी खरा ठरताना दिसत नाही.

 

 

 

या चार तासांत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी चिखलीकरांना प्रत्येक मतांच्या फेरीत झुंजविल्याचे दिसून येते.

 

 

 

आतापर्यंत प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यात मोठी चुरस असायची. पण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

 

 

 

त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. नांदेडमध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या मागे बळ उभे केले. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अवघड असेल असे वाटत होते.

 

 

 

पण सध्याच्या ज्या फेऱ्यांमधील मतांची आकडेवारी समोर आली आहे. त्यात दोन्ही उमेदवार एकमेकांचा पाठलाग करताना दिसत आहे.

 

 

 

जनतेने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठे प्रेम दिले. त्यांनी भाजपच्या गोटात प्रवेश केला. त्यामुळे आता नांदेडमध्ये भाजप मजबूत होईल अशी आशा होती.

 

 

 

पण मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशनानंतरही नांदेडकरांची काँग्रेसला सहानुभूती असल्याचे दिसून आले.

 

 

 

 

आठव्या फेरीत काँग्रेसला 14826 मतांची लीड मिळाली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसची बाजू हळूहळू भक्कम होताना दिसत आहे. आठव्या फेरीत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत.

 

 

 

लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्याकडे प्रचाराची धूरा होती. त्यांनी नांदेडमध्ये कमळ नाही तर वसंत ऋतू बहरणार असा दावा केला होता.

 

 

सध्याच्या आकडेवारीवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीचा सामना असल्याचे दिसून येते. पुढील दोन तासात चित्र अजून स्पष्ट होईल.

 

 

 

 

नांदेड सातवी फेरी

काँग्रेसचे वसंतराव चव्हाण – 146416

भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर -137369

सातव्या फेरीत काँग्रेसला 9047 मताची लीड ————- आठवी फेरी

काँग्रेसचे वसंतराव चव्हाण – 170556

भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर – 155730

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *