महसूल सहायकाला 50 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक

Revenue assistant arrested red-handed while accepting bribe of 50 thousand

 

 

 

जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित चांगेफळ (ता.पुर्णा) येथील शेतजमिनीचा मोबदला व त्या शेतातून गेलेल्या पाईपलाईनची नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या कामासाठी

 

शेतकर्‍याकडून 50 हजाराची लाच घेताना गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत महसूल सहायकासह

 

अन्य एका खाजगी इसमास पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज मंगळवारी (दि.1) दुपारी ही कारवाई केली.

यातील आरोपीचे नाव अमोल बालाजी खेडकर (वय 47 वर्ष,महसूल सहाय्यक, उपविभागीय अधिकारी कार्यालय,गंगाखेड.रा. संत जनाबाई नगर, गंगाखेड) असे आहे.

 

चांगेफळ गावातील गट क्रमांक 68 मधील शेतजमीन जालना – नांदेड समृद्धी महामार्गाकरिता संपादित झाली आहे. तक्रारदार शेतकर्‍यास या शेतजमिनीचा मोबदला मंजूर झाला असून

 

त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. ह्या संपादित शेत जमिनीतून जाणार्‍या पाइपलाइनची नुकसान भरपाईकरिता नोंद करण्यात आली नाही.

 

त्यामुळे तक्रारदार शेतकर्‍यास मंजूर झालेला संपादित शेतजमिनीचा मोबदला व त्या शेतातून गेलेल्या पाईपलाईनचे नुकसान भरपाई मिळवून देण्याच्या कामासाठी महसूल सहायक अमोल खेडकर याने

 

दादाराव गडगिळे या खाजगी इसमामार्फत तक्रारदार शेतकर्‍यास गंगाखेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात येण्यासाठी निरोप देऊन बोलावून घेतले होते.

 

तेंव्हा खेडकर याने त्यांच्या प्रलंबित कामाकरिता 50 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदार शेतकर्‍याकडे पैसे नसल्याने त्यांनी लाच दिली नाही.

 

त्यांनंतर सोमवारी (दि.30) एसीबी कार्यालय परभणी येथे आरोपी महसूल सहायक अमोल खेडकर व खाजगी इसम दादाराव गडगिळे यांच्याविरुद्ध त्या शेतकर्‍याने लेखी तक्रार दिली.

 

सोमवारी पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाचमागणी पडताळणी कारवाईमध्ये खाजगी इसम दादाराव गडगिळे याने तक्रारदार शेतकर्‍याच्या शेतजमिनीचा मंजूर मोबदला त्यांच्या बँक खात्यात टाकण्यासाठी

 

महसूल सहायक अमोल खेडकर याच्यासमक्ष 1 लाख रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती खेडकर याने ह्या कामासाठी 50 हजार रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शविली.

 

मंगळवारी (दि.1) पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कार्यवाहीदरम्यान महसूल सहायक अमोल खेडकर याने तक्रारदार शेतकर्‍याकडून 50 हजार रुपये लाच स्विकारली.

 

आरोपी खेडकर यास पोलिसांनी लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. आरोपी खाजगी इसम दादाराव गडगिळे यांचा शोध घेऊन अटक करण्याची तजवीज करण्यात आली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *