चक्क तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनचं चोरीला

The EVM machine was stolen from the Tehsil office

 

 

 

 

 

आजवर दागिने,पैसे, मौल्यवान वस्तू यांसारख्या अनेक गोष्टींची चोरी झाल्याचे आपण ऐकले आहे. पण पुण्यातील  सासवडच्या  तहसील कार्यालयात एक वेगळा व धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

 

 

या ठिकाणी ठेवण्यात आलेलं चक्क ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट  चोरीला गेलं आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना झालेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

 

 

 

पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी एका मशीनच्या कंट्रोल युनिटचीच चोरी झाली आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

 

 

शनिवार आणि रविवार असे दोन दिवस सासवड तहसील कार्यालयाला सुट्टी होती. सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आलं.

 

 

 

 

या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एका ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी आता वेगाने तपास सुरु आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *