शरद पवारांना राजकारणातून संपवण्यासाठी भाजपकडून सुपारी
Betel nut from BJP to eliminate Sharad Pawar from politics
तीन दिवसांपूर्वी भोपळला नरेंद्र मोदीच एक भाषण झालं आणि तिसऱ्या दिवशी अजित पवार भाजपात शामिल झाले. अजित दादांनी जो वेगळा निर्णय घेतला तो का घेतला? ते सर्वांना माहिती आहे.
असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका केलीय. वर्धेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनिल देखमुख यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला.
“शरद पवारांना राजकारणातून कस घरी बसवायचं अश्या पद्धतीच्या राजकारणाची भाजपाकडून अजित पवार गटाला सुपारी मिळाली आहे, आणि तश्या पद्धतीने ते काम करत आहेत..”
असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. वर्ध्यामध्ये रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेच्या तयारीसाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांनी हे विधान केले.
यावेळी पुढे बोलताना, “अजित दादांनी आपली वेगळी चूल का मांडली हे सर्वांना माहीत आहे. अनिल देशमुख यांना जसा त्रास झाला तसा आम्हला त्रास होऊ नये याकरिता आमचे जेष्ठ नेते आणि वरिष्ठ सहकारी बाहेर गेले,” असा उपरोधिक टोला अनिल देशमुख यांनी लगावला.
यावेळी बोलताना अनिल देखमुख यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदावरुनही मोठे विधान केले. “अजित दादांचे मुख्यमंत्री पदाबाबत ठरलं आहे माहित नाही.
सध्याची परिस्थिती आपण पाहत आहात अजित पवार यांना भाजपने आपल्या सरकारमध्ये सामील केले पण अजित दादा यांना कॉर्नर केल जातं आहे.. असे ते म्हणाले.
“निर्णय प्रक्रियेत असो किंवा बाहेरील राज्यातील प्रचारात अजित दादांचा समावेश नाहीय. एकनाथ शिंदे बाहेर राज्यात प्रचाराला गेले पण अजित दादांना पाठवलं नाही.
त्यामुळे अजित पवार यांनी सरकारमध्ये प्रवेश केला पण एकप्रकारे अजित पवार यांना बाजूला ठेऊन निर्णय घेतले जात असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.