भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात ,खासदाराच्या दाव्याने खळबळ
Many BJP leaders are in touch with Congress, excited by Khasdar's claim
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. माझ्याही संपर्कात भाजपचे नेते आहेत.
बरेच नेते अजूनही आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करू, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात चर्चा होतेय, ती विधानसभा निवडणुकीची… विधानसभा निवडणुकी आधी काही नेते काँग्रेसमध्ये येतील,
असा दावा वर्षा गायकवाड यांनी केला. वर्षा गायकवाड यांचं हे विधान सध्या चर्चेत आहे. त्यामुळे आता येत्या काळात राज्याच्या राजकारणात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
खासदार झाल्यानंतर 14 दिवसाच्या आत आमदारकीचा राजीनामा द्यायला लागतो. पण भुमरे यांनी तसं केलेलं नाहीये. संदिपान भुमरे यांनी राजीनामा दिला की नाही माहित नाही पण ते खासदार झालेत.
त्यांना आता मंत्रीपद सोडावा लागेल हा नियम आहे. आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागतो.
पण जर त्यांनी तसं केलं नसेल तर मग छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा निवडणुका घ्या, अशी आमची मागणी आहे. यासाठी
आम्ही आवाज उठव विरोधक म्हणून आमचा आवाज आम्ही यापूर्वी उठवलेला आहे. आताही उठवत राहू, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
नीट परिक्षेत गोंधळ उडालाय. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेली आहे. या सगळ्यांना जबाबदार कोण आहे, याचे उत्तर शोधलं पाहिजे.
मोदी मुलांसोबत संवाद साधतात परीक्षा पे चर्चा करतात. मग आता जेव्हा नीटचे पेपर फुटले. त्यावेळी त्यांनी कोणाशी चर्चा केली हा आमचा मूळ सवाल आहे.
नरेंद्र मोदींना या देशांमध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे काम इथल्या सरकारकडून होत आहे. ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणतात, मग आता का बोलत नाहीत.
या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी. जे विद्यार्थी मृत्यू पावले आहेत त्यांची आणि त्यांच्या पालकाची जबाबदारी सरकारने घ्यावी. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केलीय.
आमच्यात मोठा भाऊ छोटा भाऊ असं काही नाही. त्यांनी त्याला यांनी आधीच सांगितलेलं आहे की आम्ही सगळे समान आहोत.
सम समान राहूनच प्रत्येक पक्ष आपलं काम करेल आणि महाविकास आघाडी बळकट करेल, असं विधानही वर्षा गायकवाड यांनी केलंय.