महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले, संजय राऊत
Seat allocation of Mahavikas Aghadi has been decided, Sanjay Raut
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात आघाडी आणि युतीच्या जागावाटपाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. अशातच महाविकास आघाडीचं जागावाटप व्यवस्थित सुरु आहे.
महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. मुंबईबाबत काल चर्चा झाली. तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली.
मुंबईचं जागावाटप जवळपास झालं आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे. त्यामुळे मराठी माणूस मुंबईत राहिला पाहिजे. त्याचं अस्तित्व कायम राहिलं पाहिजे.
तशी चर्चा या बैठकीत झाली. मुंबईतील 99 टक्के जागांवर आमचं एकमत आहे. आता उर्वरित महाराष्ट्रासाठी चर्चा सुरु होईल, असं संजय राऊत म्हणाले.
काल महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्षाचे बैठक पार पडली जागा वाटपा संदर्भात 99 टक्के जागांवर आमची सहमती झाली आहे. मुंबई हा एक मोठा प्रदेश आहे महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे काय मराठी माणसाच्या वर्चस्व राहिलं आहे.
हे मुंबई तोडण्याची लचके तोडण्याचे कारस्थान सुरू आहे. त्याला शह देण्यासाठी मुंबई एकदा पुन्हा आमच्या ताब्यात असणं गरजेचं आहे.
त्यात संदर्भात जागा वाटप आम्ही करत आहोत. बंद दाराआड त्या संदर्भात कोणी बाहेरून काही सांगणार नाही. मीही सांगणार नाही.
काल मुंबईचा विषय जवळजवळ संपत आलेला आहे. आता 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राची चर्चा होईल, असं राऊतांनी म्हटलं.
लखपती दिदी कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावला भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आले आहेत.
युक्रेन पोलांड रशिया तिकडे देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला गेले होते. जळगावला देखील त्याच कामासाठी आले आहेत .. लखपती दिदी कार्यक्रमाचं निमित्त आहे.
ज्या देशात लाखो बेरोजगार आहेत. त्यांना देखील लखपती करण्याची गरज आहे. महिलांना पैसे दिले जातात आणि मुख्यमंत्री विचारत आहेत पैसे मिळाले ना पैसे मिळाले ना हे काय पद्धत झाली का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
प्रधानमंत्री महाराष्ट्रात येत आहेत. महाराष्ट्रात एक आंदोलन सुरू आहे. महिलांच्या सुरक्षेला घेऊन या आमच्या बहिणी आहेत. त्यांच्या सुरक्षेला घेऊन याबाबत प्रधानमंत्री यांनी अजून एकही शब्द काढला नाही.
ज्या जळगावत प्रधानमंत्री आहेत त्यात जळगावत पंधरा दिवसात चार जणांवर अत्याचार झाला कोणीतरी जाऊन प्रधानमंत्र्यांना सांगा.
पहिलं तुम्ही आमच्या दीदींना सुरक्षा द्या…प्रधानमंत्री फिरत राहतील आणि आमच्या बहिणी न्यायासाठी इकडून तिकडे फिरत राहतील. आधी त्यांनी महिलांच्या सुरक्षेवर बोलाव, असं संजय राऊत म्हणाले.