अन्सारी कुटुंबातील पाच जणांचा अंत, कुटुंबावर शोककळा
Death of five members of the Ansari family, mourning for the family

लोणावळा परिसरामध्ये आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पुण्यातल्या हडपसर परिसरातून वर्षा पर्यटनासाठी लिखायत अन्सारी व युनूस खान दोघेजण त्यांच्या कुटुंबासहित लोणावळा येथील भुशी डॅम परिसरामध्ये वर्षा विहारासाठी आले होते.
भुशी डॅमच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्याकडे ते वर्षाविहारासाठी गेले होते. या परिसरात पावसाचा जोर सुरू होता, पावसाचा जोर वाढल्यामुळे
त्यांच्या कुटुंबातील १० जण प्रवाहासोबत वाहून गेले. त्यापैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले असून पाच जण प्रवाहासोबत वाहून गेले आहेत. तिघांचे मृतदेह मिळाले आहेत.
साहिस्ता लियाकत अन्सारी (वय ३७ ), अमिमा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय १३), उमेरा सलमान उर्फ आदिल अन्सारी (वय ८) सर्व रा. सय्यदनगर पुणे तसेच पाण्याचे प्रवाहात वाहून गेले आहेत.
त्यात अदनान अन्सारी व मारिया अन्सारी यांचा शिवदुर्ग मित्र मंडळ व आय.एन. शिवाजी यांचे मदतीने शोध कार्य सुरु आहे. पुण्यातील या कुटुंबाला वर्षाविहार करणे चांगले महागात पडले आहे.
या घटनेननंतर लोणावळा, खंडाळा या भागात वर्षाविहारा करीता येणाऱ्या पर्यटकांनी अनोळखी ठिकाणी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये.
भुशी डॅम परिसर, घुबड तलाव, टाटा डॅम, तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट खंडाळा, कुनेगाव, कुरवंडे या भागात वर्षाविहारा करीता येणारे पर्यटकांनी पोलीस व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोणावळा व खंडाळा परिसरात वर्षाविहाराकरीता येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेऊन वर्षाविहाराचा व पर्यटनाचा आनंद घ्यावा.
तसेच निर्जनस्थळी जाऊन आपले व आपल्या कुटुंबाचे जीवन धोक्यात घालू नये असे आवाहन लोणावळा शहर पोलीस स्टेशन
यांचे वतीने करण्यात येत आहे. आज घडलेली घटना अंगावर शहारे आणणारी आहे. याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.