दहा हजार घेतांना महिलेला अटक ;जिल्हा उद्योग केंद्रात लाचलुचपतची धाड;
Woman arrested for taking 10,000; Bribery attempt at district industrial center;
शेत जमीनीवर दुग्ध व्यवसायात कर्ज मंजुर करण्यासाठी दहा हजाराची लाच घेतांना जिल्हा उद्योग केंद्रातील एका महिलेला अटक करण्यात आली. विद्या रमेश शहा असे या महिलेचे नाव आहे.
मौजे पुरी (ता. रावेर) येथील तक्रारदार असलेल्या महिलेने म्हशी विकत घेण्याकरिता कर्जासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केला होता. यावेळी केंद्रात उपस्थित विद्या परेश शाह यांनी
तक्रारदार यांना जळगाव कार्यालयातील अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे सांगून कर्ज मंजुरीसाठी आधिकाऱ्यांना ३० हजार लाचेची मागणी केली. मात्र इतकी रक्कम देणे शक्य नसल्याने तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले.
दरम्यान तक्रारदाराने लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. याबाबत पडताळणी करून उपअधीक्षक अभिषेक पाटील
यांच्या मार्गदर्शनात पथकाने जिल्हा उद्योग केंद्रा जवळ सापळा रचला. तक्रादारांकडून पैसे घेताच, येथे असलेल्या पथकाने विद्या शहा यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.