कोरोनाने धास्ती वाढवली;आज पुन्हा रुग्णात वाढ ;मृतांचा आकडा चिंताजनक

Corona has increased the fear; today again the increase in patients; the number of dead is alarming

 

 

 

 

देशभरात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने लोकांचं टेन्शन वाढलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चे नवीन २१ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 चा पहिला रुग्ण ऑगस्ट महिन्यात लक्जमबर्ग या भागात आढळला.

 

नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलं की, मंगळवारी १९ डिसेंबर रोजी कोरोनाचे ५०० रुग्ण आढळले. तर गेल्या दोन आठवड्यात कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना आधीपासूनच गंभीर आजार होते.

 

 

‘देशात कोरोनाचे २३०० सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यात कोरोना व्हेरिएंट JN.1 चे २१ रुग्ण आहेत. या कोरोना व्हेरिएंटचा पहिला रुग्ण ऑगस्ट महिन्याच्या लक्जमबर्ग येथे आढळला.

 

 

कोरोनाचा हा व्हेरिएंट हळूहळू ३६ ते ४० देशात पसरत चालला आहे. मात्र, या व्हेरिएंटला लोकांनी घाबरून जाऊ नये, मात्र आपण सतर्क राहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

 

कोरोनाचे गेल्या २४ तासांत केरळमध्ये २९२, तामिळनाडू १३, महाराष्ट्र ११, कर्नाटक ९, तेलंगाणा आणि पुडुच्चेरीत ४ रुग्ण आढळले आहेत. दिल्ली आणि गुजरातमध्ये ३, पंजाब आणि गोव्यात १ रुग्ण आढळला आहेत.

 

 

जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की, ‘मंगळवारी १९ डिसेंबर रोजी कोरोनाच्या ‘जेएन. 1’ला या व्हेरिएंटला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ असं म्हणण्यात आलं आहे.

 

 

तसेच त्यांनी या व्हेरिएंटपासून जास्त धोका नसल्याचं म्हटलं आहे.देशाच्या केरळमधील तिरुवनंतरपुरम जिल्ह्यातील काराकुलममध्ये ७८ वर्षीय महिलेमध्ये Corona JN.1 व्हेरिएंट आढळून आला होता. हा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट असलेल्या पिरोलापासून तयार झाल्याचे सांगण्यात आलं आहे.

 

 

 

कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा या आधी कोरोना झाला आहे किंवा लस घेतलेल्यांनाही संक्रमण होण्याची शक्यता आहे. या कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, नाक गळणे, घसादुखी, गॅस्ट्रो, डोकेदुखी लक्षणे दिसून येतात.

 

 

 

दरम्यान भारतासह अनेक देशांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. अशातच जगासाठी सगळ्यात मोठा धोकादायक असलेला कोरोनाचा आजार पुन्हा आपले डोके वर काढत आहे.

 

 

 

सिंगापूरमध्ये डॉक्टर्संनी वेगाने वाढत्या कोविड १९ पाहता लोकांना लसीकरण करण्यास तसेच मास्क घालण्यावर जोर दिला आहे.

 

 

सिंगापूरमध्ये कोविड १९, इन्फ्लुएंजा आणि सामान्य सर्दीसह श्वसनाचे आजार वाढत आहेत. द स्ट्रेटस टाईम्सच्या मंगळवारच्या एका रिपोर्टनुसार

 

 

 

१२०हून अधिक क्लिनिकांची सर्वात मोठी सीरिज हेल्थवे मेडिकल आणि ५५ जीबी क्लीनिक असलेल्या पार्कवे शेंटनचे म्हणणे आहे की त्यांनी श्वसनाच्या आजारांमध्ये ३० टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

 

 

 

रिपोर्टमध्ये म्हटले की, ४३ जीपी क्लिनिक असलेल्या रॅफल्स मेडिकलमध्येही असेच प्रकारचे आजार पाहायला मिळत आहेत. सिंगापूरच्या २५ पॉलिक्लिनिकमध्ये दररोज २९७० प्रकरणे समोर येत आहेत.

 

 

वर्षाच्या या कालावधीत २०१८ ते २०२२ पर्यंत पाच वर्षांच्या सरासरीने दरदिवशी २००९ प्रकरणे होती. दरम्यान, या महामारीच्या पहिल्या वर्षात

 

 

दर दिवसाला ३ हजार ते ३५०० प्रकरणे समोर येत होती. कोरोनाबाबत सजगता बाळगल्याने हे प्रमाण गेल्या तीन वर्षात कमी झाले होते.

 

 

 

२०२० आणि २०२१मध्ये डिसेंबरच्या सुरूवातीला पॉलिक्लिनिकमध्ये एका दिवसाला १०००हून कमी प्रकरणे पाहायला मिळाली होती. पॉलिक्लिनिक्समध्ये प्रायमरी केअर सेटिंगमध्ये साधारण २० चक्के गंभीर प्रकरणांवर इलाज केला जातो.

 

 

तर १८००जीपी क्लिनिक बाकी केसेस सांभाळतात. त्याच आठवड्यात ३२ हजाराहून अधिक लोकांवर कोरोनाचे उपचार करण्यात आले. साधारण ४६०जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील ९ जण गंभीर स्थितीत होते.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *