अशोक चव्हाणांची नाना पटोलेंवर सडकून टीका
Ashok Chavan's harsh criticism of Nana Patol

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या आणि टीकाशस्त्र सुरूच आहे. ”अशोक चव्हाण हे स्वार्थी आहेत.
नाचता येईना अंगण वाकडे”, अशी टीका नाना पटोले यांनी भोकरच्या सभेदरम्यान केली होती. त्यांच्या या टिकेला अशोक चव्हाण यांनी देखील प्रतिउत्तर दिले.
”नाना पटोलेसारखा बेजबाबदार माणूस मी पहिला नाही. त्यांच्यामुळे काँगेसची ही बिकट अवस्था झाली आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं”, असं अशोक चव्हाण म्हणाले.
महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सोमवारी भोकरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
अशोक चव्हाण पुढे म्हणाले की ”नांदेड मधील निवडणुकीत मलाच टार्गेट केलं जात आहे. उमेदवार सोडून काँगेसचे नेते माझ्याबद्दल बोलत आहेत. काल नाना पटोले म्हणाले की अशोक चव्हाण स्वार्थी आहेत.
पक्षात असताना ते काही बोलले नाही, आता सूरु झालं. मी पक्षात असताना बाहेर कधी जाणार ते पाहत होते. त्यांना हेच माहिती नाही की निवडणूक अशोक चव्हाणांची आहे
की प्रताप पाटील चिखलीकरांची आहे. नाना पटोले सारखा बेजाबदार माणूस मी कधी पाहिला नाही. त्यांच्यामुळे काँगेसची आज ही अवस्था झाल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.”
”तुम्हाला तिन्ही पक्षांनी विधानसभा अध्यक्ष केलं. पण तुम्हाला मंत्री व्हायचं होतं म्हणून तुम्ही राजीनामा दिला”, असा गंभीर आरोप देखील अशोक चव्हाण यांनी नाना पटोलेंवर केला.
”त्यांनी राजीनामा दिला त्याच दिवशी ठरलं हे सरकार पडणार आहे. देवेंद्रजींना मी दोष देत नाही. नाना पटोलेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं”
असं अशोक चव्हाण म्हणाले. ”हा माणूस इतका उतावळा’, इतका बेजबाबदार यांनी राजीनामा देऊन टाकला. हा माणूस पक्षाचा अध्यक्ष झाला आणि पक्षाची वाताहत झाली आहे” असा आरोप देखील अशोक चव्हाण यांनी केला