कसाऱ्याजवळ मालगाडीचे ७ डबे घसरले;या गाड्या खोळंबल्या
7 coaches of goods train derailed near Kasara; these trains derailed

मुंबई : मुंबईहून उत्तर भारतात आणि विदर्भासह मराठवाड्यात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कसारा ते टीजीआर ३ या दरम्यान डाऊन मुख्य लाइनवर सायांकाळी साडे सहा वाजता मालगाडीचे सात डबे रुळावरुन घसरले आहेत.
यामुळं कसारा आणि इगतपुरी दरम्यानच्या डाऊन मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. यामध्ये लोकल सेवा मात्र विस्कळीत झालेली नाही. इगतपुरी ते कसारा अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली नसून ती सुरळीत सुरु आहे.
कसाऱ्यावरुन इगतपुरीच्या दिशेनं जाताना टीजीआर ३ हे स्थानक आहे. यामुळं ७ ट्रेनवर परिणाम झाला आहे.
१२२६१ सीएसएमटी हावडा एक्स्प्रेस आसनगाव स्थानकात थांबवण्यात आली आहे.
११४०१ सीएसएमटी आदिलाबाद नंदिग्राम एक्स्प्रेस हीओम्बरमाली स्थानकात थांबवण्यात आली आहे.
१२१०५ सीएसएमटी गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस ही घाटकोपर स्थानकात थांबवण्यात आली आहे.
१२१०९ सीएसएमटी मनमाड पंचवटी एक्स्प्रेस विक्रोळी स्थानकात थांबवण्यात आली आहे.
१७६१२ सीएसएमटी नांदेड एक्स्प्रेस सीएसएमटीहून निघाली आहे.
१२१३७ सीएसएमटी फिरोजपूर पंजाब मेल एक्स्प्रेस सीएसएमटीहून निघाली आहे.
१२१७३ एलटीटी प्रतापगड एक्स्प्रेस कसारा स्थानकात थांबवण्यात आली आहे.