सावकाराच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या;मराठवाड्यातील घटना
Tired of being questioned by a moneylender, committed suicide; incident in Marathwada

व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून मनमानी रक्कम वसुली केली जात आहे. व्याजाचे पैसे न दिल्यास मारहाण देखील केली जाते. याच अवैध सावकारीमुळे नांदेडच्या एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.
व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावला जात असल्याने एका ४२ वर्षीय व्यवसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
शहरातील छत्रपती चौक येथील अंबिकानगर येथे बुधवारी दुपारी ही हळहळ व्यक्त करणारी घटना घडली. समीर येवतीकर असं मयताच नाव आहे. आत्महत्येपूर्वी समीरने चिठ्ठी देखील लिहली आहे.
मयत समीर येवतीकर यांचा आवळा कँडी विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. आपल्या कुटुंबासह ते अंबिका नगरमध्ये राहत होते.
बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी घराच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये गळफास घेतला. काही वेळाने ही बाब त्यांच्या पत्नीला समजली.
पत्नीने धावत दोरी कापली. पण तोपर्यंत येवातिकर यांची प्राणज्योत मावळली. येवतीकर यांनी काही जणांकडून पैसे घेतले होते.
पैसे देण्याचा तगादा लावल्याने कंटाळून समीर येवतीकर यांनी आत्महत्या केली, असा आरोप मयत येवतीकर यांचे वडील सुधारक येवतीकर यांनी केला.
आत्महत्येपूर्वी समीर यांनी चिट्टी लिहिण्याची माहिती आहे. ती चिट्टी पोलीसांनी जप्त केली असून तपास सूरु आहे.पोलिसांच्या तपासातून नेमकी आत्महत्या का केली हे समोर येणार आहे.